शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

५ परिवारामुळे १२६ परिवार वेठीला; पुर्नविकास रखडल्याने रहिवाशांचे जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 10:41 PM

नालासोपारा पूर्वेकडील सागर प्रकाश इमारतीची कहाणी : सभासदांमधील वाद उठणार सगळयांच्या मुळावर?

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेने धोकादायक इमारती म्हणून ३ वेळा नोटीस धाडल्यामुळे बेघर होण्याऐवजी इमारतीचा पुर्नविकास करण्याचा निर्णय १३१ परिवाराने सर्वानुमते ९ एप्रिल २०१७ ला घेतला. १२६ परिवाराने इमारतीमधील सदनिका खाली करून आजूबाजूच्या परिसरात भाड्याने स्थलांतरित झाले आहे पण 5 परिवारांनी अजून पर्यंत सदनिका खाली न केल्यामुळे १२६ परिवार वेठीस धरले गेले आहेत. ही दु:खद कहाणी आहे नालासोपारा पूर्वेकडील गाळानगर परिसरातील सागर प्रकाश इमारतीची.

१९८९ साली लोढा ग्रुपने सात विंगची १३१ सदनिकांची सागर प्रकाश नावाची इमारत नालासोपारा पूर्वेकडील गाळानगर परिसरात बांधली होती. पण या इमारतीला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इमारतीची भिंत जीर्ण अवस्थेत, स्लॅब निखळलेल्या अवस्थेत, आतील लोखंडी सळ्या गांजलेल्या दिसत होत्या आणि रस्त्यालगतचा सज्जा कोसळलेल्या अवसतेत झाल्यामुळे इमारतीची परिस्थिती अतिशय दयनीय झाली होती. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग डी च्या सहायक आयुक्तांनी सागर प्रकाश इमारतीला धोकादायक म्हणून तीन वेळा नोटिसा पाठवल्या होत्या. २०१६ साली सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदांनी इमारतीचे हस्तांतरण करून घेऊन पुनिर्वकास करण्याचे मीटिंगमध्ये ठरविण्यात आले होते. ९७/अ यानुसार पाठपुरावा करून ९ एप्रिल २०१७ साली सोसायटीच्या वार्षिक मिटिंगमध्ये इमारतीच्या पुर्नविकास करण्यासाठी त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना देण्याचे वसई सब रजिस्टर विभूते यांच्या अध्यक्षतेखाली ठराव पास झाला होता. या कंपनीने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात पुर्नविकास करण्यासाठी कागदपत्रे जमा केल्यावर रीतसर बांधकामाची परवानगी देण्यात आली. पण ४० ते ४५ सभासदांनी सदनिका खाली केल्या नसल्याने १७ फेब्रुवारी २०१९ ला शेवटची व ८ वी मिटिंग घेऊन 31 मार्च पर्यंत सदनिका खाली करून पुढील कामासाठी इमारत बिल्डरच्या ताब्यात देण्याचे ठरले. ५ सभासद परिवाराने सदनिका खाली न करता सर्वांनी सदनिका खाली करून दिल्या. पण 5 जणांनी खाली न केल्याने इमारतीच्या पुर्नविकासाचे काम रखडले असून १२६ परिवार रस्त्यावर आले आहे.

रविवारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदाची रविवारी मिटिंग आयोजित करून ५ परिवारांना समजविण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिल्याने १२६ परिवार हताश झाले असून त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. १२६ परिवाराला गेल्या १ वर्षांपासून प्रत्येक मिहन्याचे भाडे न चुकता देत आहे. या ५ परिवाराने बिल्डरकडून जास्त पैशाची, दुकानाची मागणी केल्यामुळे ती पूर्तता न केल्याने हे सदनिका खाली करत नसल्याचा आरोप इतर सभासदांनी केला आहे.

काही सभासदांच्या स्वार्थी पुर्नविकास रखडला असून जर पावसाळयात ही इमारत कोसळून काही दूरघटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा सवाल इमारतीतील रहिवासी करित आहेत. त्याचे उत्तर कुणाकडेच नाही.

५ आडमुठ्या परिवारांना पोलिसांचे सहकार्य?ही इमारत पुनिर्वकास करण्यासाठी सर्वांनी अनुमती दिल्यानंतर गणेश दुबे, रोशनी शेराजी, राकेश मिश्रा, सीताबाई खाटीक आणि माया भोगण यांना कोणी तरी भडकवले असून पोलीस ठाण्यात तक्र ारी घेऊन या असे या ५ आडमुठया परिवाराला सांगणारे तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कोण ? इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना ५ परिवाराच्या सदनिकाचे वीज, पाण्याचे कनेक्शन कापू नये म्हणून सज्जड दम दिला असून त्यांच्याच नावाने हे 5 परिवारातील लोक १२६ परिवाराला दम देत असल्याचे अनेक व्हििडओ यांच्याकडे रेकॉर्डिंग असल्याचेही कळते.

नोकऱ्या सोडून सोसायटीच्या पुनर्विकासासाठी सर्व जण धावपळ करत आहेत. आधी सर्व सभासद तयार होते मग या 5 सभासदांना कोणी भडकवले ? हे जाणीवपूर्वक सर्व सभासदांना त्रास देत असून खोट्या खोट्या तक्रारी तुळींज पोलीस ठाण्यात करत आहे. 5 जणांना लालच असल्याने बिल्डरला ब्लॅकमेलिंग करत असून पैसे मागितल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. - कांचन कोरडे (चेअरमन, सागर प्रकाश सोसायटी )

रेरामध्ये कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर रेरामध्ये शुक्र वारी इमारतीच्या प्रपोजलसाठी शुक्रवारी मान्यता मिळाली असून रेरामध्ये ५७ हजार रुपयांची फी भरली आहे. सोसायटीच्या सभासदांनी तयारी दाखवल्यावर पुनिर्वकासाची इमारतीची कागदपत्रे वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सुपूर्द केल्यावर बांधकाम परवानगी फेब्रुवारी मिहन्यात देण्यात आली आहे. - जितू सिंग(भागीदार, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स)

३ नोटिसा देऊन इमारतीला धोकादायक घोषित महानगरपालिकेने केले असून बाकीच्यांनी सदनिका खाली केल्या मग या ५ परिवाराला घराबाहेर का काढत नाही मनपा ? या पावसाळ्यात धोकादायक झाल्याने कोणती अिप्रय घटना होऊन जीवितहानी झाली तर याला जवाबदार कोण ? मेन्टनस बंद केल्याने या ५ परिवारामुळे २५ हजाराचे वीज बिल आले असून महानगरपालिकेचे पाण्याचे बिल येणार ते आता कोण भरणार ? - रंजित कोरडे (खजिनदार, सागर प्रकाश सोसायटी)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार