वसई : वसई पूर्वेस वालीव, राजावळी परिसरातील ५ दगड खाणींना महसूल विभागाने सील लावले असून त्यांना १५२ कोटी रू. चा दंड ठोठावण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता तसेच शासनाचा शेकडो कोटींचा महसूल बुडवून खाणी सर्रास सुरू होत्या. आठ मालकांनी ४ लाख ६६ हजार ९५४ ब्रास दगड या खाणीतून काढलेत. सर्व्हे नं. २६ वालीव येथून यलप्पा राजप्पा धोत्रे यांनी ८३ हजार ६९३ ब्रास दगड काढलेत. त्यांना ४४ कोटी ४० लाख ७ हजार ९६९ रू., यशवंत पाटील यांनी ५१ हजार ४० ब्रास दगड काढलेत, त्यांना २७ कोटी ६० लाख ६७ हजार ९९५, काशिनाथ मुकुंद पाटील - ६४ हजार ७१४ ब्रास - ३४ कोटी ३३ लाख ८ हजार ३००, गोविंद धोंडू पाटील - ८९ हजार ९८३ ब्रास - ४७ कोटी ७३ लाख ६२ हजार ८९१, अनित जयंत पिंपळे - ४७ हजार २०२ ब्रास, सर्व्हे नं. ५१ - २५ कोटी ४ लाख ९ हजार ३१५, संतोष पाटील सर्व्हे क्र. १ - २१ हजार ११८.७३ ब्रास - ११ कोटी २० लाख ३४ हजार ८६२, वसंत काशिनाथ धुमाळ - ६३ हजार ३९३ ब्रास, सर्व्हे नं. २६ - ३३ कोटी ६३ लाख ३ हजार ८४३ व अंतोनी जॉन परेरा - ४५ हजार ८११ ब्रास सर्व्हे नं. १८६/२, राजावळी २४ कोटी ३७ लाख ४३ हजार ५३० रू. असा एकूण १५२ कोटी रू. चा दंड महसूल अधिकाऱ्यांनी ठोठावला आहे. ८ पैकी ५ जणांच्या दगडखाणींना सील ठोकले असून उर्वरित तिघांना सरकारी जागेवर उत्खनन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्वांना महसूलने नोटीसा बजावल्या असून अद्याप कोणाचाही खुलासा प्रशासनाकडे आलेला नाही. (प्रतिनिधी)
वसईत दगडखाणींना १५२ कोटीचा दंड
By admin | Published: October 20, 2015 11:31 PM