पालघर: पालघर, सफाळेवासीयांचे मुंबई-ठाणे येथे प्रवास करताना आता १५ किलोमीटरचे अंतर वाचणार असून इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. सफाळे-सोनावे-खानिवडे रस्त्यासाठी २ कोटी २५ लाखाचा निधीलाही मंजुरी मिळाली असल्याने मुंबई-अहमदाबाद क्र मांक ८ या मार्गावरील वाहतुकीचा भार ही कमी होणार आहे.
सफाळे-पारगाव-सोनावे-दारशेत मार्गे खानीवडे असा रस्ता उभारल्यास पालघर, बोईसर, केळवे, माहीम, सातपाटी, सफाळे, एडवन, कोरे, दातीवरे आदी अनेक गावातील प्रवाशी जे पालघर, मनोर, मार्गे महामार्ग क्र मांक ८ वरून जात होते त्यांना मोठा फायदा मिळणार असल्याने २० ते २५ वर्षांपासून हा रस्ता सफाळे येथील मंगेश गोविंद तरे यांच्या कडून सुचिवण्यात आला होता. मात्र या रस्त्यासाठी ०.९९ हेक्टर जमीन वनविभागा कडून मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून लालिफतीत अडकला होता. त्यामुळे पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते एस बिराजदार यांनी ग्रामपंचायत पातळी वरून प्रस्ताव पालघर वनविभाग, उपवनसरक्षक डहाणू कार्यालया नंतर जिल्हा पातळीवरील वनहक्क समिती कडे गेलेला दावा मान्य करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर वरील जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर दारशेत ते खानीवडे, टोलनाका, कवळी पाडा हा २.२ किमी रस्ता मनरेगा अंतर्गत करण्यात आल्याचे बिराजदार यांनी लोकमतला सांगितले. आता पुढे पारगाव ते दारशेत व पुढे खानीवडे टोल नाका असा सुमारे चार किलोमीटर्स च्या रस्त्याला नोव्हेंबर महिन्यापासून सुरु वात होणार असून २०२० च्या मार्च मिहन्या पर्यंत हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.१५ किमी अंतर कमी होणारपालघर तालुक्यात एडवन, कोरे, केळवे, वड राई, सातपाटी, मुरबे आदी मच्छीमारी गावातून मासे नायगाव, क्र ॉफर्ड मार्केट, भाऊचा धक्का इथे विक्रीस नेला जातो. तसेच दूध, भाजीपाला आदी मुंबईत नेला जात असल्याने १५ किमी अंतर कमी होणार असल्याने मोठी आर्थिक बचत होणार आहे.