जव्हार : तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचार आता वाढत चालेले असून असाच प्रकार कौलाळे ग्रामपंयतीमध्ये झाला असून यात दोषी ग्रामसेविका व ग्रामविस्तार अधिकारी भास्कर शिंदे यांच्यावर तात्काळ निलंबानाची कारवाई करा या मागणीसाठी श्रमजीवी संघटने कडून मंगळवारी जव्हार पंचायत समिती कार्यालया समोर सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान, या अपहार प्रकरणी झालेल्या अनियमतिता संदर्भात २० दिवसांत चौकशी करून दोषी विरोधातील प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन गट विकास अधिकारी, जव्हार यांनी दिले आहे.कौलाळे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका तृप्ती बल्लाळ यांनी आमचा गाव आमचा विकास, ५ टक्के पेसा निधी व चौदावा वित्त आयोग या योजनेतून एकूण रू. १४ लाख ६७ हजार ५२५ रूपयांचा अपहार केल्याची नोटीस पंचायत समिती कार्यालयातून ५ आॅक्टोबर रोजी पाठविण्यात आली होती. यामध्ये सन २०१६-१७ करीता पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लागणारा ग्रामसभेचा ठराव ९ सप्टेंबर रोजी करण्यात आला होता. मात्र, तो घेताना कुठल्याही बाबींवर आर्थिक रक्कमेची तरतुद करण्यात आलेली नाही. तसेच ग्रामसभा इतिवृत्तही मोघम लिहिलेले असून इतिवृत्त अपुर्ण असल्याचा ठपका नोटीस द्वारे ठेवण्यात आला आहे. तसेच ५ टक्के पेसा अबंध निधीतून बाकडे खरेदी करतांना ग्रामसभेच्या इतिवृत्ता नुसार ठोक रक्कमेची तरतुद नाही. परंतू आराखड्यामध्ये रक्कम रूपये १ लाख ५५ हजार ची तरतुद असतांना ३ लाख ६२ हजार ३६२ इतका खर्च केलेला आहे.कुठलेही साहित्य खरेदी करतांना एक लाख किंवा त्यापेक्षा जास्तीची खरेदी करतांना ई-निविदा प्रणालीचा अवलंब करणे अनिवार्य असतांना तसे केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे खरेदी संशयीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.तसेच चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रा. पं. कौलाळे येथील आंगणवाडी साहित्य खरेदी तसेच जाधव सोलार सिस्टीम यांच्या कडून सोलार साहित्य खरेदी व इतर खर्च केलेला असून तो करतांना ई-निविदा प्रणालीला फाटा दिला आहे. तसेच साहित्याची नोंद साठे रजिस्टरमध्ये करण्यात आलेली नाही त्यामुळे ७ लाख ६९ हजार ९५३ रूपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर कौलाळे ग्रा.विस्तार अधिकारी भास्कर शिंदे यांनी ५ टक्के पेसा निधीद्वारे विकास कामासाठी ५ लाख ७२ हजार ९०० इतका खर्च केलेला आहे.लाखोंची प्रकरणेखर्च केलेल्या साहित्याची प्रमाणके घेतलेली दिसून आलेली नाहीत. त्यामुळे वरील रक्कमेच्या ५० टक्के रक्कमेस तुम्हाला जबाबदार धरण्यात येत आहे. तसेच चौदाव्या वित्त आयोगा मध्ये ४ लाख ४१ हजार यातही अपहार असून ५० टक्के रक्कमेस जबाबादार धरण्यात येत आहे. तसेच ग्रामनिधी योजना अंतर्गत कॅशबुक तपासणीत १ लाख ५० हजार ४३६ रुपये खर्चाच्या रक्कमेचे प्रमाणक व मुळ बिले तपासणीच्या वेळी उपलब्ध झाल्या नाहीत, त्यामुळे सदर रक्केचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अपहाराची २० दिवसांत चौकशी, श्रमजीवीचे सत्याग्रह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:38 AM