पालघर - सफाळ्याच्या तांदुळवाडी किल्ल्यावर भरकटलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप सुटका करीत त्यांना रेल्वेने घरी पाठविण्यात आले आहे.मुंबई पासून १०४ किमी तर ठाणे पासून अवघ्या ७५ किमी वर पालघर तालुक्यातील तांदुळवाडी किल्ला तरुणाईला आकर्षित करतो. रविवारी मुंबई आणि ठाणे येथून २९ तरु ण-तरु णींनी तांदुळवाडी किल्ल्यावर चढण्यास सुरु वात केली. दिवसभर किल्ल्यावर भ्रमंती करून आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याची मजा लुटल्यानंतर या सर्व तरु णांनी खाली उतरण्यास सुरु वात केली. खाली उतरण्याची पायवाट हे तरु ण चुकल्याने तासभर ते किल्ल्यावरच फिरत राहिले. दरम्यान अंधार दाटल्याने हे सर्व पर्यटक किल्ल्यावरच अडकून पडले. या भागात बिबटे व हिंस्त्र श्वापदे असल्याने या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यातील काही पर्यटकांनी पालघर पोलीस कंट्रोल रुमशी संपर्कसाधून मदतीची याचना केली. सफाळे पोलीस स्टेशन चे स पो नि. संदीप सानप यांनी काही ग्रामस्थ, पोलीस पाटील यांना सोबत घेऊन पर्यटकांना खाली आणले.
तांदूळवाडी किल्ल्यावरून २१ पर्यटकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:58 AM