शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

By admin | Published: January 11, 2017 6:09 AM

वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले.

विरार : वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले. यामध्ये ३० महिला आणि ८० बेवारसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटते आहे.वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड भार्इंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडणे, गाडीत चढत असताना निसटून पडणे, टपावरून प्रवास करतांना शॉक लागणे, गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करतांना पोलला धडकून पडणे या सारख्या घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होत असतो. विरार, नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडले आहेत.मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे स्टेशनच्या ३५ कि.मी.च्या अंतरात २०१४ या सालात ३०५ अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये १७६ पुरूष आणि २६ स्त्रीयांची ओळख पटली होती. उर्वरित ९१ पुरूष आणि १२ स्त्रीयांची ओळखच पटली नसल्याने बेवारस मृतांचा आकडा १०३ होता. २०१५ या सालामध्ये एकूण २६४ जणांचे बळी गेले. त्यात मीरारोड येथे २०, भाईंदरमध्ये ४३ , नायगावमध्ये ११, वसईत ५५, नालासोपारा येथे -५७, विरारमध्ये -७३ आणि वैतरणा परिसरातील चार जणांचा समावेश आहे. ७३ जणांची ओळख पटली नव्हती.जानेवारी-डिसेंबर २०१६ मध्ये मीरारोड-२५,भाईंदर-३७, नायगाव-१४, वसई-३८,नालासोपारा-४४, विरार-८१, वैतरणा-५ असे मिळून २४४ जण मृत्यूमुखी पडले होते. मृतांमध्ये ३० महिलांचा समावेश होता. मृतांपैकी १६४ जणांची ओळख पटली होती. तर ८० बेवारस होते.गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून रेल्वे अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या घटलेली दिसून येते. २०१४ मध्ये ३०५ मृत्यूमुखी पडले होते. २०१५ मध्ये त्यात घट झाली होती. २०१५ वर्षी मृतांची संख्या २६४ होती. तर गेल्या वर्षी २४४ जणांचा मृत्यू झाला होता. वैतरणा ते मीरा रोड दरम्यान प्रत्येक स्टेशनवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने स्टेशन परिसरात भिंती बांधल्या आहेत. त्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांचे रस्ते बंद होऊ लागले आहेत. तसेच रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. परिणामी अपघातात घट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.प्रवास करताना स्वत:ची काळजी घेतल्यास अपघाती मृत्युंपासून बचाव होऊ शकतो. प्रवाशांनी जीन्यांचा वापर करून सुविधांचा वापर केला पाहिजे. जलद प्रवासाच्या नादात प्रवाशी आपला जीव गमावत आहेत. यासाठी प्रवासी संघटनांनी जनजागृती मोहिम हाती घेतली पाहिजे. - महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक