हुसेन मेमन, जव्हार: पालघर जिल्ह्यात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय असून सगळ्याच तालुक्यात अगदी चोख नियोजनातून अतिशय शिताफीने जनावरे चोरून घोटी येथे विक्री करण्यात येत असते,मंगळवारी सकाळी ८.३० ते १० च्या सुमारास जव्हार तालुक्यातील वडोली गावानजीक एक ट्रक संशयास्पद हालचाली करताना स्थानिक नागरिकांनी पाहिले, त्या ट्रकची पाहणी केली असता, त्यात त्यांना २५ जनावरे, असा एकूण एक लाख अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्दमाल हस्तगत करण्यात आला, दरम्यान उपस्थित नागरिकांनी जव्हार पोलीस ठाणे येथे संपर्क केला असता, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनातून जव्हार पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आरोपिताना ताब्यात घेवून त्यांच्या सोबत एक ट्रक देखील हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान जनावरांची चोरटी वाहतूक करताना दोन आरोपित मिळून आले असून त्यांना नोटीस देवून सोडून दिले आहे, दोषींवर कारवाई म्हणून जव्हार पोलीस ठाणे गु.र.न. II 247/2023, प्राण्यांचा प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (डी) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 5 (ए)(बी), 9, सह मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 192(ए) सह केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 125 (ई) प्रमाणे कलमे लावण्यात आले असल्याची माहिती पोलीस विभागातून प्राप्त झाली आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी जव्हार यांचे कार्यक्षेत्रात जनावरे चोरी करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आणले असून, मुक जनावरांना स्थानिकांच्या मदतीने जीवन संजीवनी देण्यात आली आहे, असे प्रकार करणाऱ्या कुणावरही गय केली जाणार नसल्याचे सर्व पोलीस स्थानकात सूचना देण्यात आल्या असून स्थानिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. - शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार