वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई पूर्वेला मुंबई - अहमदाबाद महामार्गावर सातिवली पुलाजवळ मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉ. थॉमस उलेदर यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या अपघातात त्यांची दोन मुले देखील मृत्यू पावली असून पत्नी मात्र रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.नायगांव येथे राहणारे डॉ.थॉमस उलेदर हे पत्नी मेरी, १० वर्षाचा मुलगा बेनी आणि दुसरा ५ वर्षाचा मुलगा इझायल यांच्यासह एका कार्यक्र मासाठी गाडीने विरारला नातेवाईकाकडे जात होते. गुजरात लेनवर जाताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, गाडी मुंबईच्या लेनवर येऊन पडली आणि तेथे त्यांना दुसºया टेम्पोने उडविले. त्यात हे मृत्युमुखी पडले.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचले होते डॉ.थॉमस२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते. आपल्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी ते कामा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळेस डॉ. थॉमस उलेदर सोबत त्यांचे भाउजी आणि मित्र ही होते. त्या तिघांना दहशतवादी कसाब व अब्बू इस्माइल याने बंधक बनवलं होतं. मात्र त्यातून हे तिघे आश्चर्यकारकरित्या वाचले .मंगळवारी उशिरा घडलेल्या या भीषण अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. डॉ.थॉमस उलेदर हे नायगांव येथील सिटीझन कॉलनीत राहत होते. या दुर्देवी घटनेनंतर सध्या वसई नायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते, पण काळाने गाठले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:32 AM