शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

वसईकरांना २७९ व्या वसई विजयोत्सवाचे वेध

By admin | Published: May 03, 2017 5:10 AM

देशाच्या इतिहासात वसईचा रणसंग्राम मराठ्यांच्या रक्ताने लिहीला गेला. या ऐतिहासिक विजयाला या वर्षी २७९ वर्ष पुर्ण होत असून

विरार : देशाच्या इतिहासात वसईचा रणसंग्राम मराठ्यांच्या रक्ताने लिहीला गेला. या ऐतिहासिक विजयाला या वर्षी २७९ वर्ष पुर्ण होत असून, वसई -विरार महानगरपालिका व वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळातर्फे भव्य वसई विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगर पालिकेने या विजयोत्सवाची जय्यत टायरी सुरु केली आहे.पोर्तुगीजांच्या जुलमी अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी व हिंदू रक्षणासाठी बाजीराव पेशव्यांनी आपले बंधू चिमाजी आप्पा यांना सन १७३९ मध्ये वसई मोहिमेवर पाठवले होते. चिमाजी आप्पांनी तब्बल चोवीस महिने कडवी झुंज देऊन पोर्तुगीजांचा पराभव केला. युरोपीय सत्तेविरोधातील आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर मराठ्यांच्या इतिहासातला हा पहिलाच मोठा विजय होता. या युद्धात एक कोटींची वित्तहानी होऊन बावीस हजार मराठ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.२७९ व्या वसई विजयोत्सवानिनित्त बुधवार दि. १० मे रोजी सकाळी वसई किल्ल्यातील श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन अध्यक्ष भाऊसाहेब मोहळ, डॉमनिक घोन्सालवीस, बबनशेठ नाईक, उद्धव घरत, सुरेश वायंगणकर, यशवंत पाटील तसेच डॉ.उमेश पै यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता वसई अ‍ॅडव्हेंचर्स क्लबच्यावतीने वज्रेश्वरी देवी मंदिर ते वसई किल्ल्यापर्यंत भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. ती मध्ये देखावे, ढोलपथक तसेच दुचाकी वाहन व सायकलस्वार सहभागी होणार असल्याचे क्लबचे विजय चौधरी व प्रेषित राऊत यांनी सांगीतले.किल्ले बांधणी प्रदर्शन, वसईतील ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, डॉ. श्रीदत्त राऊत यांच्याकडून वसई किल्ला सफर दुर्गप्रेमींना घडविण्यात येणार आहे. संध्याकाळी जाणता राजा शिवछत्रपती या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. तसेच बच्चेकंपनीसाठी बालजत्रेचे व खाद्यमहोत्सवाचे आयोजनही यावेळी करण्यात येणार आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रविणा ठाकूर, खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार विलास तरे, उपमहापौर उमेश नाईक, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, आयुक्त सतिश लोखंडे तसेच नारायण मानकर उपस्थीत राहतील. विरार, नालासोपारा, वसई व नायगांव पश्चिमेकडून परिवहन सेवेची सुविधा ठेवण्यात आलीे आहे. (वार्ताहर)शनिवार-रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमवसई -विरार महानगरपालिकेच्या स्थापनेपासून वसईत गेल्या काही वर्षात या दिनानिमित्त विविध  कार्यक्र म केले जातात. २७९ व्या वसई विजयोत्सवानिमित्त पालिकेकडून बुधवार दि. १० मे व शनिवार -रविवार १३ व १४ मे २०१७ रोजी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्र म ठेवण्यात आले आहेत.