मनोर : शासकीय आश्रम शाळेतील तीन मुलांना फूड पॉइझन झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्याध्यापक मात्र याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत होते तर अधीक्षक घरी डुलक्या घेत होते. याबाबत पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.विक्र मगड तालुक्यातील चाबके तलावली येथे शिक्षण घेणारे दोन विद्यार्थीनी व एक विद्यार्थी यांना अन्नातून किंवा दूषित पाण्यातून विष बाधा झाली झाल्या असावी त्यामुळे काही काळ त्यांची प्रकृती बिघडली त्यांच्या पोटात कळा येऊ लागल्या व त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यांना उपचारा साठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रोहिणी किसन किरिकरे, रणजित संदीप दुमडा दोघेही इयत्ता पाचवी, माधुरी, जयराम पारधी , सहावी अशी त्यांची नावे असून ते उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ गावित ह्यांनी सांगितले की कुठल्यातरी फूड पॉयझनिंगमुळे हे झाले असावे.ते कदाचित पाण्यामुळेही होऊ शकते त्यांच्यावर आम्ही औषधे आणि सलाईनचे उपचार केले आहेत. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे त्या ठिकाणचे पाणी आणले आहे त्याची तपासणी होईल.मुख्याध्यापक सुधीर माने यांना विचारले असता ते म्हणाले शाळेत ५०० विद्यार्थी आहेत त्यांना काही झाले नाही यांनांच कसे झाले त्यांनी सकाळी बाहेर जाऊन वडापाव खाल्ला होता म्हणून त्याची प्रकृती बिघडली असावी त्यांना उपचारासाठी मी स्वत: रुग्णालयात आणले आहे. आश्रम शाळेचे अधीक्षक कुठे आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की ते घरी गेले आहेत. रणजित चे वडील संदीप दुमडा यांनी सांगितले की माझ्या मुलाची तब्येत रात्री खराब झाली. त्याच्या पोटात दुखत होते हे आम्हाला त्याला सकाळी मनोरला आणले तेव्हा माहीत झाले. आणि आम्ही आलो. आश्रम शाळेत लाखो रुपये येतात मात्र त्या आश्रम शाळेत मुलांना मिळणारा जेवण बरोबर नसते म्हणून माझ्या मुलाला पोटात दुखत असावे. आश्रमशाळेत पुरेशी स्वछता नाही.
आश्रमशाळेतील ३ मुलांना विषबाधा; प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:04 AM