शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्ह्यात ३१४ शेततळी

By admin | Published: February 22, 2017 6:01 AM

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ३१४ शेततळ्यासाठी

हितेन नाईक / पालघरसिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ३१४ शेततळ्यासाठी २ कोटी ६० लाखाचे अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षासाठी १ हजार ४२९ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले आहेत.हा जिल्हा शेतीप्रधान असून त्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर इतके आहे.भात, नागली, तूर, उडीद,मूग,खुरसानी याची १ लाख ४ हजार १०२ हेक्टरवर लागवड होते. रब्बी पेरणी ५ हजार ७४३ हेक्टरवर होते.तर रब्बी भाजीपाला लागवडी खाली ४ हजार ४६८ हेक्टरचे क्षेत्र होते. मागच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी लाखो हेक्टर क्षेत्र लागवडी पासून वंचित रहात असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील विक्र मगड,जव्हार,मोखाडा या आदिवासी बहुल डोंगराळ क्षेत्रात सिंचनाचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे पावसाळ्यातील भातशेती नंतर हा सर्व भाग ओसाड आणि सुकून जातो. पावसाचे पाणी साठविण्याची योग्य सोय नसल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते व रब्बी उन्हाळी लागवडीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने आपल्या ओसाड पडलेल्या जमिनी सोडून इथला भूमिपुत्र रोजगाराच्या शोधार्थ शहराकडे धाव घेतो.पावसात पडलेला खंड व पाण्याच्या टंचाई मुळे पिकांचे नुकसान होऊ नये तसेच रब्बी उन्हाळी हंगामात संरक्षित सिंचन देऊन कडधान्य व भाजीपाला पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास शेततळे हा चांगला पर्याय ठरत असल्याने मागेल त्याला शेततळे हि योजना राबविण्यात आली . तसेच आत्मा योजनेंतर्गत खोदलेल्या शेततळ्यात मत्स्यपालनासाठी रोहू, कटला, मृगल ई. मत्स्यबीज ही पुरविले जाते.उद्दिष्ट ५०० शेततळ्यांचेशेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या सामूहिक शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात ५०० शेततळे उभारण्याचे टार्गेट देण्यात आले असून शेततळ्यामुळे सिंचनात वाढ होऊन शेतकरी आता वेलवर्गीय भाज्याबरोबर टॉमॅटो, वांगी, मुळा, कोबी इ. उत्पादन घेऊ लागल्याने आता पालघर तालुक्यातून २१५ अर्ज,जव्हार १६९, तलासरी ७०, मोखाडा १६५, वाडा ३२४, डहाणू २६९, विक्रमगड १८४ तर वसई ३३ असे एकूण १ हजार ४२९ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राजेश्वर पाटील ह्यांनी लोकमतला दिली.त्यामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळे च्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षित्रय आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केल्या नंतर समाधान व्यक्त केले होते.त्यामुळे येत्या काही वर्षात सिंचनाचे प्रमाण वाढून शेतकर्यांच्या हाताला नक्कीच चांगला रोजगार मिळेल असा विश्वास कृषी अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.लाभार्थी निवडीचे निकष :शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी.लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळयासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.दारिद्र्य रेषेखालील,आत्महत्याग्रस्त कुटुंबास प्राधान्य आवश्यक कागदपत्रेजमिनीचा ७/१२ व ८ अ चा उतारादारिद्र्य रेषेखालील असल्यास कार्डबॅंक खाते तपशीलआधार कार्ड