शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

मच्छीमार सहकारी संस्थांना ४ कोटींचा तोटा, आता संस्थांनी मच्छीविक्री व निर्यातीसाठी एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 3:00 AM

पालघर: सातपाटी मधील दोन्ही सहकारी संस्थेमार्फत व्यापारांनी खरेदी केलेल्या पापलेटच्या प्रतिकिलो दरात सुमारे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपयांची घट केल्याने दोन्ही संस्थेला अडीच महिन्यात सुमारे ४ कोटी ६६ लाख ८५ हजार ३९८ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

हितेंन नाईकपालघर: सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थेमार्फत व्यापारांनी खरेदी केलेल्या पापलेटच्या प्रतिकिलो दरात सुमारे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपयांची घट केल्याने दोन्ही संस्थेला अडीच महिन्यात सुमारे ४ कोटी ६६ लाख ८५ हजार ३९८ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. डॉलरची घसरण आणि बाजारपेठेतील मंदीची कारणे व्यापारी देत असल्याने त्यावर इलाज म्हणून सर्व मच्छीमार संस्थांनी मासे निर्यात आणि विक्री करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.राज्यातील किनारपट्टीवरील बंदरात होणा-या मासेमारी पैकी सातपाटी गावातील मासेमारी नौकांनी आणलेला पापलेट हा चवीत रुचकर असल्याने खवय्यासह निर्यात करणारे व्यापारी इथल्या पापलेटला प्राधान्य देतात. परंपरागत ‘गिल नेट’ पद्धतीच्या जाळ्यातून प्रवाहाने वाहत जाणारे मासे पकडून एका विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या पेटीतील बर्फात साठवून ठेवले जात असल्याने त्याची चव अनेक दिवस टिकून राहते. त्यामुळे इथल्या मच्छीला मोठी मागणी असते.प्रत्येक वर्षी पापलेटच्या भावात वाढ करूनच भाव घोषित करण्याची पद्धत आहे. यावर्षी ही मागच्या वर्षी असलेल्या सुपर क्वालिटीचा पापलेट प्रति किलो १३५० रु, एक नंबरला ११४० रु, दोन नंबर ला ८५० रु, तीन नंबर ला ६२५ रु , चार नंबर ला ४१६ रुपये या पेक्षा अधिक भाव मिळेल ह्या आशेवर सर्व मच्छीमार व त्यांच्या संस्था होत्या. मात्र यावर्षी २०१६ मध्ये पापलेटला गेल्या वर्षी असलेल्या दरापेक्षा व्यापाºयांनी अचानक प्रति किलो शंभर ते एकशे पंच्याहत्तर रु पये एवढा भाव उतरविल्याने सहकारी संस्था प्रचंड धास्तावल्या होत्या. संस्थांच्या संचालकांनी व्यापाºयांना निदान गेल्या वर्षीचा भाव तरी द्यावा अशी गळ घातली. परंतु डॉलरचे उतरलेले भाव आणि जागतिक बाजार पेठेत आलेली मंदी इ. ची कारणे देत व्यापारी आपल्या मतावर ठाम राहिले होते.सातपाटी सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्थेच्या माध्यमातून १५ आॅगस्टला सुरू होणाºया मासेमारी कालावधी पासून ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुपर प्रतीचा पापलेट ५ हजार ४६९ किलो, एक नंबर प्रतीचा २२ हजार २१६.२ किलो, दोन नंबरचा ६९ हजार किलो, तीन नंबर ९१ हजार १३.३ किलो, तर चार नंबरचा पापलेट २२ हजार ६३५.३ किलो असा एकूण २ लाख १० हजार ३३३.७ किलो पापलेट व्यापारानी खरेदी केला. मागच्या वर्षीच्या दराने या सर्व मच्छींची एकत्रित किंमत १५ कोटी ७६ लाख ५९ हजार १३० रु पये एवढी झाली असती मात्र यावर्षी दरात व्यापाºयांनी घट केल्याने संस्थेला फक्त १३ कोटी ४८ लाख ७१ हजार ६२० रु पये मिळाल्याने संस्थेला निव्वळ २ कोटी २७ लाख ८७ हजार ५१० रु पयांचा तोटा सहन करावा लागल्याचे संस्थेचे चेअरमन रवींद्र म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले.सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून १५ आॅगस्ट नंतर सुरू झालेल्या मासेमारी कालावधी नंतर आॅक्टोबर या अडीच महिन्यात सुपर पापलेट २ हजार ८४५.५ किलो, एक नंबर १२ हजार १३ किलो,दोन नंबर ३७ हजार ६०६.५ किलो, तीन नंबर ४९ हजार ३४३.५ किलो,चार नंबर १० हजार ६५१ किलो असा एकूण 1 लाख 12 हजार ४५९.५ किलो पापलेट व्यापाºयांनी खरेदी केला होता. मागच्या वर्षीच्या दराने या मच्छीची किंमत सुमारे ८ कोटी ४७ लाख ७२ हजार २७३ रु पये एवढी झाली असती मात्र ह्यावर्षी दरात घसरण झाल्याने फक्त ६ कोटी ७६ लाख ७४ हजार ९७५ रु पये मिळाल्याने संस्थेला १ कोटी ७० लाख ९७ हजार २९८ रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे संस्थेचे चेअरमन संतोष मेहेर ह्यांनी सांगितले.त्यामुळे दोन्ही संस्थेला ह्यावर्षी एकूण ४ कोटी ६६ लाख ८५ हजार ३९८ रु पयांचा अवाढव्य तोटा सहन करण्याची पाळी ओढवल्याने मच्छीमार कुटुंबात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.>सरकारने भांडवल पुरवावेउच्चशिक्षित मच्छीमार तरुणांनी मच्छी निर्याती बाबत सखोल अभ्यास करून नवीन क्र ांती घडवून आणायला हवी व विशिष्ट समाजाचे असणारे प्राबल्य मोडून काढायला हवे.- भरत धोंडे, चार्टर्ड अकाऊंटंट.निर्यातीसाठी आम्ही आजही तयार असलो तरी भांडवल उभारणी बाबत आम्ही कमी पडतो. शासन पातळी वरून अल्पदराच्या व्याजाने भांडवल पुरवठा केल्यास आम्ही निर्यातीच्या दृष्टीने पावले टाकू शकतो.-संजय तरे,उच्चशिक्षति तरु ण, (टीूँ.ील्लॅ.)