लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - ४ मजल्याची बांधकाम परवानगी असताना ७ व्य मजल्यावर अस्तित्वात नसलेला फ्लॅट मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यास विकून त्याची साडेबारा लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे .
मुंबई पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक असलेले विल्यम डिसोझा हे भाईंदर पूर्वेच्या गोडदेव गावा मागील व्ही एम हाईट्स इमारतीत भाड्याने राहतात . व्ही एम हाईट्स च्य कार्यालयात मेघ डेव्हलपर्स चे भागीदार संजय चित्रोडा आणि त्यांची बहीण चेतना यांनी इमारतीच्या ७ व्य मजल्यावरील सदनिका ४६ रुपयांना विक्री करायचे सांगितले . डिसोझा यांनी ५१ हजार टोकन रक्कम नोव्हेम्बर २०२० मध्ये भरली .
नंतर चित्रोडा , चिंतन सह स्वयं आणि मेघना डेव्हलपर्स चे भागीदार म्हणवणारे किशोर शाह यांची कार्यालयात भेट झाली असता आता ३० लाख भराल तर फ्लॅटची किंमत आणखी कमी करू असे सांगितले . डिसोझा यांनी यांची पूजा गार्डन मधील सदनिका विकून २७ लाख शाह याच्या खात्यात भरले . नंतर डिसोझ यांना एमओयू , रेरा प्रमाणपत्र , महापालिकेची कागदपत्रे दिली .
परंतु महापालिके कडून वरच्या मजल्यांची बांधकाम परवानगी अजून मिळाली नाही सांगत तिघांनी डिसोझा यांना फ्लॅट दिला नाहीच शिवाय पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागले . २०२२ च्या अखेरीस शाह याने १५ लाख रुपये डिसोझा याना परत केले . ४ मजल्याची परवानगी असताना ७ व्या मजल्याचा फ्लॅट विकून १२ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली बद्दल १७ ऑगस्ट रोजी नवघर पोलीस ठाण्यात डिसोझा यांनी फिर्याद दिल्यावर चित्रोडा , शाह व चेतना ह्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे .