पारोळ : दफ्तर पावसामध्ये भिजल्यामुळे पारोळ तलाठी सजाबाहेर सध्या शेतकऱ्यांच्या रांगा असून सातबारावर ४३ ची नोंद होत नसल्याचे महसूली कामाचा खोळंबा झाला आहे. त्याकरीता सजातून दाखले घेऊन तालुक्याला खेटे घालावे लागत असल्याने शेतकरी नाराज आहेत. दरम्यान वसई पूर्व विभागाचे प्रातांधिकारी देपिवली येथे आले असल्याने त्यांना त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.सचा अंतर्गत पारोळ, उसगाव, माजीवली, देपिवली, तिल्हेर, करजोण, शिरवली या गावांची कागदपत्रे २००२ साली झालेल्या महापुरात भिजले होते. १० वर्षा पूर्वी ३२ ग झाले असतानाही फेरफार भिजल्याने पुराव्या अभावी सातबारावर ३२गची नोंद होत नसल्याने सावकारी जमिनी बाबत शेतकरी काळजीत पडले आहेत.तहसीलदार कार्यालयात असलेल्या दप्तरावरु न फेरफारा बाबतची अडचण लवकर सोडण्यात येईल.शेतकरी तहसील कार्यालयात आल्यास त्याला ही नोंद मिळेल.-दिपक क्षीरसागर,प्रांतधिकारी, वसई
४३ची नोंद व्हावी म्हणून प्रांताना निवेदन, फेरफार लटकले, पारोळ सजातील विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:44 PM