शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

अर्बनसाठी ४४ टक्के मतदान

By admin | Published: July 30, 2015 12:33 AM

जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. पावसाचे कारण असले तरी एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स)

जव्हार : जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. पावसाचे कारण असले तरी एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) मुळे व थकीत कर्ज प्रकरणासाठी चर्चेत असणाऱ्या या बॅँकेच्या निवडणुकीत मतदानाचा उत्साह दिसला नाही.जव्हारमधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बॅँकेचे मतदान जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, मनोर, वाडा, कुडूस असे एकूण १०,५८६ आहेत. त्यापैकी ४७२७ म्हणजे ४४.६५ टक्के सर्वत्र मतदान झाले. यामध्ये १७ संचालकपदांसाठी एकूण ३५ उमेदवार रिंगणात होते. त्यात सहकार व शिवनेरी पॅनलचे व २ अपक्ष उमेदवार असे रिंगणात होते. परंतु, पावसाचा मोठ्या प्रमाणावर मतदानावर विपरीत परिणाम झाल्यामुळे यात कुठल्या पॅनलचे पारडे जड होणार, याची खात्री कुठल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांना सांगता येत नाही.या निवडणुकीत सर्वसाधारण १२ जागांसाठी २५ उमेदवार, तर राखीवमध्ये एससी, एसटीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, ओबीसीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, एनटीच्या एका जागेसाठी २ उमेदवार तर महिलांसाठी राखीव असणाऱ्या दोन जागांसाठी ४ उमेदवार असे एकूण ३५ उमेदवार रिंगणात उतरले होते. याकरिता जव्हार येथे ८ बूथ, मनोर २ बूथ, खोडाळा १, विक्रमगड ३, मनोर ३, वाडा १, कुडूस १ असे एकूण १९ बूथचे नियोजन सहकार विभागाने केले होते. याकरिता ९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)निवडणूक रंगतदार यात मजेदार बाब म्हणजे एका मतदाराला तब्बल १७ उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यामुळे निवडणूक रंगतदार झाली. काही मतदार आपल्या आवडीच्या निवडक उमेदवारांना मते द्यायचे तर कोणी पूर्ण पॅनलच्या उमेदवारांना मते द्यायचे. त्यामुळे निकाल काय असेल, याचा नेम नाही. मतदार यादीमध्ये गोंधळ मतदार यादीमध्ये अनेक जुन्या व नवीन मतदारांची नावे नसल्याच्या आज तक्रारी समोर आल्या तर अनेकांची नावे मनोरमध्ये तर मनोरमधील विक्रमगडमध्ये असे प्रकार घडल्याची तक्रार घनश्याम आळशींनी केली.निवडणुकीतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर, बोईसर, कुडूस या केंद्रांतील मतमोजणी ३० जुलै रोजी जव्हार येथे होणार आहे़ साधारण: संध्याकाळपर्यंत निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे.