शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या ५ आरोपींना पकडले, तुळींज पोलिसांचे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 5:37 PM

तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

मंगेश कराळे -नालासोपारा - शहरातील पूर्वेकडील एका इमारतीच्या घरातून  सोमवारी संध्याकाळी २१ लाख रुपयांचे एम डी नावाचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या पाच आरोपींना अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे यांना दत्त नगर येथील एका इमारतीच्या घरात अंमली पदार्थ खरेदीसाठी ४ ते ५ जण राजस्थान येथून येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, दत्त नगर येथील दत्त आशीर्वाद इमारतीमधील सदनिका नंबर ३०२ मध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सापळा लावून धाड टाकली. त्यावेळी राजस्थान राज्यातून एम डी विकत घेण्यासाठी आलेले दिनेशकुमार बिश्नोई (३१), सुनिल बिश्नोई (३०), ओमप्रकाश किलेरी (३०), लादूराम बिश्नोई (४०) आणि प्रकाशकुमार बिश्नोई (२३) या पाच बिश्नोई टोळीतील आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींची झडती घेतल्यावर त्यांच्या कब्जात २१० ग्रॅम वजनाचा २१ लाख रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच सात मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, रोख असा एकूण २२ लाख ८ हजार ५१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना घरी बोलावून अंमली पदार्थ विकणारा प्रकाश भादू याच्यावरही गुन्हा दाखल केला असून या फरार आरोपीचा शोध तुळींज पोलीस घेत आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, माने, केंद्रे, कदम, छबरीबन यांनी केली आहे. 

पाचही आरोपींना मंगळवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - विनायक नरळे (सहाय्यक पोलीस आयुक्त)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ