वसई-विरार शहर महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभरात वसई नालासोपारा व विरार मध्ये 5 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर मंगळवारी मात्र वसई विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातुन एकही रुग्ण मुक्त झालेला नसल्याची माहिती पालिकेने दिली त्यामुळे आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 158 इतकी झाली असून मंगळवारी आढळून आलेल्या मध्ये .3 पुरुष व 2 महिला रुग्णाचा समावेश असून हे सर्वजण वसई-1 ,नालासोपारा -2 आणि विरार -2 अशा विभागतले मिळून एकूण 5 रुग्ण आहेत पालिकेने दिलेल्या माहितीनुसार यात वसई पश्चिमेकडील 51 वर्षीय रुग्ण चुळणे गावातील असून तो मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असून विरार मधील 46 वर्षीय बाधित महिला रुग्ण हि मुंबईत नर्स आहे सोबत विरार पूर्वेतील 28 वर्षीय महिला हि मुंबईत बँक कर्मचारी आहे.तासेव्ह नालासोपाऱ्यात 42 वर्षीय रुग्ण हा बँकेत सुरक्षा रक्षक तर येथील नालासोपारा पूर्वेस 35 वर्षीय रुग्ण हा रुग्णालय कर्मचारी आहे. या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 158 वर गेली आहे तर आजवर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत,मात्र मंगळवारी एकही रुग्ण कोरोना मुक्त झाला नसल्याने मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 80 वर च राहिली आहे आणि आजवर 70 रुग्णावर वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत --दि.5 मे 2020 मंगळवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारीवसई -1 पुरुष ,नालासोपारा -2 पुरुष विरार -2 महिलाएकूण रुग्ण संख्या -5वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -158कोरोना मुक्त संख्या :- 80कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 70
वसई- विरारमध्ये 5 कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 8:34 PM