हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : माहिमच्या समुद्र किनाºयावर बुधवारी पहाटे ४० ते ५० फूट लांबीचा कुजलेल्या अवस्थेतील व्हेल (देवमासा) माशाचे अवशेष आढळून आले. साधारणपणे २ महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्यानंतर समुद्रात वाहत तो माहिमच्या किनाºयावर लागल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.
देवमासा या जलचर प्राण्याचे बाह्य स्वरूप जरी माशासारखे असले तरी तो मासा नसून तो सस्तन प्रवर्गात समाविष्ट असतो. मासे हे अंडी घालत असले व देवमासा हा एक मासा असला तरी तो पिल्लांना जन्म देत असल्याने त्याची गणना सस्तन प्राण्यात केली जाते. देवमाशांच्या सुमारे ३७ जाती असून ब्ल्यू व्हेल : (निळा देवमासा), फिनबॅक व्हेल, सी व्हेल, हंपबॅक व्हेल : (कुबड असलेला देवमासा), ग्रे व्हेल (करडा देवमासा), राइट व्हेल आदी अनेक व्हेल माशाच्या जाती आढळून येतात. देव माशाचा मृत्यू म्हणजे खरे तर एका नवीन जैविक प्रणालीची सुरुवात असते. देवमाशाचे शव जेव्हा समुद्राच्या तळाशी अतिशय खोलवर (एक हजार मीटरपेक्षा जास्त खोलावर) जाऊन पडते त्याला इंग्रजीमध्ये व्हेल फॉल असे म्हणतात. मराठीत आपण त्याला देवमाशाचा शक्तीपात किंवा देहपात असे म्हणतो.
माहिमच्या किनाºयावर लागलेल्या अवाढव्य अशा देवमशाचा मृत्यू हा सुमारे २ महिन्या पूर्वीच झाल्याचा निष्कर्ष वन विभागाने काढला असून मृत्यू पश्चात तो प्रवाहाने वाहत किनाºयावर लागला. वन विभागाने त्याचा पंचनामा करून माहीम सागरी पोलिसांच्या मदतीने त्याला किनाºयावरच त्याचे दफन करण्यात आले.