पालघर : रौद्ररूप धारण केलेल्या समुद्राच्या लाटा सातपाटीच्या किना-यावरील बंधा-याला पार करून घरांना धडकू लागल्या आहेत. ह्यातून निर्माण होणारी वित्त आणि जीवितहानी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांनी पुढाकार घेतला असून बंधाºयाच्या डागडुजीसाठी नैसर्गिक आपत्ती निकषानुसार सुमारे ५० लाखाच्या निधीच्या मंजुरीचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या जिल्हानियोजन बैठकीत मंजुरी मिळताच तात्काळ हे काम हाती घेण्यात येणार आहे.सातपाटी येथे १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या १३०० मीटरच्या बंधाºयातील दगड समुद्राच्या महाकाय लाटांच्या तडाख्याने वाहून गेल्याने बंधाºयाला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. आपली घरे वाचविण्यासाठी ती भगदाडे बुजविण्याचे काम स्थानिक मच्छीमार प्रत्येक वर्षा प्रमाणे ह्यावर्षी ही करीत असून वाहून गेलेले दगड पुन्हा भगदाडात टाकणे, मातीच्या मोठमोठ्या गोणी संरक्षित अडथळे म्हणून आपल्या घरा समोर रचून ठेवण्याची कामे करीत आहेत. परंतु दिवसेंदिवस समुद्राचे रौद्र रूप वाढत असून मच्छीमारांनी मोठ्या मेहनतीने रचून ठेवलेले अडथळे दूरवर भिरकावून देत हा समुद्र किनारपट्टीच उद्ध्वस्त करीत आहेत. दि.१३ जूनपासून पासून महाकाय लाटा किनाºयावरआदळायला सुरुवात झाली असून समुद्राचे पाणी मच्छीमारांच्या घरात घुसु लागले आहे. त्यामध्ये मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे.मच्छीमारांच्या घरातील लहान मुले, महिला, वृद्ध आपापली घरे वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत असल्याने लोकमतने शुक्रवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शक फोटो दाखविले होते. १३ जून ते १२ सप्टेंबर दरम्यान २४ दिवस सुमारे ५ मीटर्स च्या लाटा उसळणार असून किनारपट्टीवरील घरांना मोठा धोका असल्याचे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून देऊन युद्धपातळीवरील उपाय योजनेची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी तात्काळ तहसीलदार महेश सागर ह्यांना वस्तुस्थिती दर्शक पाहणी अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. त्यांनीही तात्काळ घटनास्थळी जाऊन बंधाºयांची झीज झाल्याने समुद्राचे पाणी घरात घुसून वित्त व जीवितहानीच्या शक्यतेचा अहवाल काही तासातच जिल्हाधिकाºया पुढे सादर केला.बंधारा दुरुस्तीसाठी पतनअभियंता, अभियांत्रिकी विभागा कडून निविदा मागविण्यात आली असून त्यांनी ४५ लाख ३४ हजार ४२५ रुपयांची निविदा सादर केल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी लोकमतला दिली.हा बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यास तात्काळ कामाला सुरुवात होऊ शकते. परंतु सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने ३ जुलै पर्यंत आचारसंहिता लागली असून १५ ते २० जुलै दरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक अपेक्षित आहे. त्या बैठकीत कामाला मंजुरी मिळाल्या नंतरच कामाची निविदा काढली जाऊन ठेका वाटपा नंतर बंधाºयाच्या दुरु स्ती कामाला सुरु वात होणार आहे. त्यामुळे नैसर्गीक आपत्ती निवारण ह्या निकषा खाली युद्धपातळीवर ह्या कामाला मंजुरी मिळवून घेतल्यास किनारपट्टीवरील मच्छिमार, शेतकरी, बागायतदार ह्याची वित्त व जीवितहानी टळू शकते.>...तर नव्या बंधाºयासाठी मिळेल पाच कोटींचा निधीमहाराष्ट्र शासनाच्या पतन विभागाकडून कोकणातील सतरा तर जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, घिवली, एडवन आणि तारापूर अशा पाच धूपप्रतिबंधक बंधाºयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली पण ते सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरण (सीआरझेड) च्या कचाट्यात सापडले. सध्या शासन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असून निर्णय शासनाच्या बाजूने लागल्यास सातपाटीच्या नव्या धूपप्रतिबंधक बंधारा उभारणीसाठी ५ कोटींचा निधी तात्काळ प्राप्त होऊ शकतो असे पतन अभियंत्यांनी लोकमत ला सांगितले. जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षा कडे तात्काळ निधी जमा केल्यास निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ह्या समतिीद्वारे निविदा, ठेका आदी प्रक्रि या पूर्ण करून युद्धपातळीवर काम हाती घेता येऊ शकते. जून महिन्यात १३ जून ते १८ जून पर्यंत जुलै महिन्यात १२ ते १७ जुलै पर्यंत आॅगस्ट महिन्यात १० ते १५ आॅगस्ट दरम्यान तसेच ९,१०, ११ , १२ सप्टेंबरला ५ मीटर्स च्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे हे काम तातडीने होणे आवश्यक आहे.
सातपाटी बंधाऱ्यासाठी ५० लाख, जिल्हाधिकारी सादर करणार प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:12 AM