मोखाडा: या तालुक्यात १४२९ बालके कुपोषणाने पीडित असून ५१३ बालके तीव्र कुपोषित आहेत यामुळे पुन्हा शीतल निखडेसारखे कुपोषणबळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मोखाड्यातील सागर वाघ आणि ईश्वर सवरा या बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याने कुपोषणाचे भयाण वास्तव समोर आले होते. परंतु या घटनेला काही काळ उलटताच बलड्याचापाडा येथील शीतल चिंतामण निखडे या ४ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नोव्हेंबर महिन्यात कुपोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे कुपोषण निर्मूलनाचा दावा फोल ठरला असून आमदार खासदार मंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी केलेले दौरे पोकळ ठरले आहेत यामुळे आजच्या ‘बालदिनी’ या बालकांना शुभेच्छांऐवजी उत्तम आरोग्य देणाऱ्या सेवेची गरज आहे हे प्रशासनाला कधी कळणार? आज जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी सांगते की, जिल्ह्यात ७ हजार ३२० बालके कुपोषणाने पीडित असून २०१६ मध्ये आजपर्यंत कुपोषणाचे १२६ बळी गेले आहेत. यामुळे प्रशासन खासदार आमदार यांनी केलेले दौरे शोबाजी ठरली असून ठोस उपायांची गरज अधोरेखित झाली आहे. (वार्ताहर)
मोखाड्यात ५१३ बालके कुपोषित
By admin | Published: November 15, 2016 4:07 AM