- शशी करपे, वसईथेट प्रवासी नसल्याचे कारण देवून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ एसट्या बंद करण्यात आल्यामुळे पालघर विभागाला दररोज १० ते १२ लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर एसट्या बंद झाल्याने दररोज शेकडो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे हाल होऊ लागले आहेत. पर्यायी प्रवाशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना दूरवर मुंबईला जाऊन एसटी अथवा रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. थेट प्रवासी नसल्यामुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांने दिल्याचे बोलले जात आहे.थेट प्रवासी नसले तरी या लांब पल्ल्यांच्या गाड्या दररोज पन्नास हजार रुपयांचा गल्ला भरून काढत आहेत.पालघर विभागाच्या डेपोतून निघालेल्या या गाड्यांमध्ये शेवटच्या डेपोपर्यंत प्रवास करणारे प्रवासी कमी असतात. मात्र, टप्पा वाहतुकीचा परवाना, हात दाखवा आणि एस.टी.थांबवा हे धोरण तसेच वाहक आणि चालकाच्या प्रामाणिक सेवेमुळे पन्नास हजारांचा गल्ला गाठण्यास एस.टी.ला यश येत होते. डेपोतून निघालेली लांब पल्ल्याची गाडी महामार्ग,ठाणे,पनवेल,पुणे असे टप्पा प्रवासी घेत जाते. त्यासाठी वाहक ओरडून प्रवाशांना आवाहनही करताना दिसून येतात. त्यामुळेच या गाड्यांना भरपूर नफा मिळत होता. तरीही परिवहन मंत्र्यांच्या आदेशामुळे पालघर विभागातील लांब पल्ल्यांच्या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. दररोजचा २१ हजार ८२१ किलोमीटरचा एस.टी.प्रवास आता बंद झाला आहे.त्यामुळे पालघर विभागातील एस.टीला दररोज १० ते १२ लाखांचा फटका बसत आहे.पालघर विभागांतर्गत जव्हार, डहाणू, बोईसर, पालघर, सफाळा, विरार,नालासोपारा आणि वसई असे आठ आगार येतात. त्यातून वडूज,पैठण, अमळनेर, औरंगाबाद, नंदुरबार, पाथर्डी, भुसावळ, धुळे, शिरपूर, चाळीसगांव, आंबेजोगाई, संगमनेर, पंढरपूर, लातूर, स्वारगेट, चोपडा, सोलापूर, भूम, फलटण, विटा, भुसावळ, बीड, कोल्हापूर, शहादा, अकोला,पाटोदा, सातारा, सांगोला, गेवराई, झांजवड अशा तीस ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना होणाऱ्या नफ्यामुळे शहरी वाहतुकीचा तोटा भरुन काढला जात होेता. मात्र,आता या नफ्यातील गाड्या बंद करून एसटीने आपल्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. बंद करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे पालघर विभाग अध्यक्ष भरत पेंढारी यांनी केला आहे.पालघर जिल्ह्यात एसटी हाच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सामानासहीत थेट गावापर्यंत ये- जा करण्यासाठी एसटी हाच मार्ग आहे. मात्र, तो बंद झाल्याने आता शेकडो प्रवाशांना मुंबई सारख्या दूरवर जाऊन एसटी अथवा रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. जिल्हयात दूरवर रहात असलेल्या प्रवाशाला गावी जायचे असेल तर लोकलने मुंबई गाठावी लागते. विशेष म्हणजे या निर्णयाची जनतेला कोणतीही माहिती जाहीरपणे दिलेली नाही. याबाबत जाहीर आवाजही उठविला गेलेला नाही. विशेष म्हणजे ज्यांना या निर्णयाची खडान्खडा माहिती आहे अशा एसटी कामगार संघटनाही याबाबत काहीच आवाज उठवत नाहीत. मूळ गाडीकुठपर्यंतपालघर - औरंगाबाद नाशिकपालघर - नंदुरबार नाशिकपालघर - पाथर्डीनगरपालघर - भुसावळ धुळेपालघर - शिरपूर नाशिकवसई - आंबेजोगाई आळेफाटावसई -औरंगाबाद आळेफाटाअर्नाळा - चोपडा नाशिकअर्नाळा - सोलापूर इंदापूरअर्नाळा - पंढरपूर फलटणअर्नाळा - भूम जामखेडअर्नाळा - भुसावळ मालेगांवजव्हार - पंढरपूर फलटणजव्हा र- औरंगाबाद नाशिकजव्हार - अकोला धुळेबोईसर - पैठणनगरबोईसर - औरंगाबादनाशिकबोईसर - पाटोदा आळेफाटासोपारा - गेवराईशेवगांव
थेट प्रवाशांअभावी ५४ बसेस बंद
By admin | Published: September 27, 2016 3:41 AM