- रविंद्र साळवे, मोखाडामागेल त्याला ५० हजाराच्या अनुदानासह शेततळे देण्याची जलयुक्त शिवार अंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राबविली जाणारी योजना या तालुक्यात यशस्वी ठरली असून आतापर्यंत २१ ग्रामपंचायतींच्या कक्षेत ५६ शेततळे साकारली असून ११३ शेततळ्यांचे प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्यापासून कोसो दूर अंतरावर राहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यत मोखाडा कृषी विभागाने ही योजना पोहोचविलेली आहे. यामुळे आदीवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणार असून शेतीच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. तसेच उपलब्ध पाणी साठ्यातून विविध पिके दुबार किंवा तिबार घेता येणार आहेत. जास्तीच जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेचा गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- पी.बी. वाणी (तालुका कृषी अधिकारी मोखाडा)
मोखाडा तालुक्यात साकारली ५६ शेततळी
By admin | Published: February 19, 2017 3:57 AM