शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

जव्हारच्या १९ सजांसाठी ६ कर्मचारी, कर्मचाऱ्यांचा तुडवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:07 AM

तीन मंडळ व १९ सजा असून त्यात जुन्या १४ तर नवीन ५ सजांचा समावेश आहे.

- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यात तीन मंडळ व १९ सजा असून त्यात जुन्या १४ तर नवीन ५ सजांचा समावेश आहे. तीन मंडळ अधिकाºयांची नेमणूकही प्रभारी मंडळ अधिकाºयांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच, या सजांचे कामकाज फक्त सहा तलाठी पाहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.जव्हार, जामसर, साखरशेत या मंडळा अंतर्गत जव्हार, कासटवाडी, आपटाळे, कौलाळे, न्याहाळे बु., वाळवंडा, पाथर्डी, मेढा, डेंगाचीमेट, पिंपळशेत, देहरे, तलासरी, वावर, दाभेरी, विनवळ, कोगदा, हिरडपाडा, जामसर अशा एकूण १९ सजाचें कामकाज फक्त ६ तलाठी पाहत असून इतक्या मोठ्या तालुक्याकरीता फक्त ६ कर्मचारी असल्यामुळे शेकडो कामे रेंगाळली आहेत. तसेच, याहून अधिक धक्कादायक म्हणजे या सर्व सजांकरीता कार्यालय उपलब्ध नसून जव्हार शहरातीतल मंडळ कार्यालयातूनच सर्व कारभार सुरू असतो.दरम्यान, या मंडळ अधिकारी कार्यालयाचीही दुर्दशा झाली असून ही इमारत मुकणे संस्थानकाळातील असून जव्हारच्या महाराजांनी ती शासनाला सुपूर्द केलेली आहे.मात्र, या वास्तूमध्ये प्रशासनाकडून शौचालय, पाणी आदी प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. तालुक्याचे सीमाक्षेत्र असलेल्या जागांची महत्वांची कागदपत्रे व नोंदी ठेवणारे हे कार्यालय आहे. मात्र त्यासाठी चांगली कपाटे नाहीत, पावसाळ्यात तर गळती लागते. अशा ठिकाणी महत्वाचे दस्ताऐवज कसे ठेवायचे? हा प्रश्न आहे.>आपत्ती व्यवस्थापनाचा भत्ता लटकलेलाचमहसूल विभागाच्या नवनवीन योजना येत असतात. या सर्व योजनांचा अतिरिक्त भारही या तोकड्या कर्मचाºयांवर सोपवला जात आहे. मध्यंतरीच्या काळात वसई तालुक्यात अतिक्रमण पाहणीसाठी व पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाकाजासाठी जव्हार तलाठी कार्यालयाचे सर्व कर्मचारी व मंडळ अधिकाºयांची नेमणूक तब्बल महिनाभरासाठी करण्यात आली होती. याकामाचा प्रवासी भत्ता व मानधन अद्याप या कर्मचाºयांना मिळालेला नाही. पदरमोड करून हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी कार्यालय चक्क कोतवालाच्या भरवशावर सुरु होते. अधूनमधून तर कार्यालयीन वेळेत कार्यालयाला कुलूप असायचे अशा वेळी येथील भोळीभाबडी गरीब आदिवासी जनता आपली पदरमोड करून तलाठी कार्यालयाच्या बाहेर तासंतास रखडून माघारी फिरत होती.