शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

जिल्ह्यात ६४ शाळा अनधिकृत

By admin | Published: June 13, 2017 3:11 AM

या जिल्ह्यातील पाच तालुक्यात एकूण ६४ शाळा अनधिकृत घोषित झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षा पासून ह्या शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्याचे काम

- लोकमत न्युज नेटवर्क

पालघर : या जिल्ह्यातील पाच तालुक्यात एकूण ६४ शाळा अनधिकृत घोषित झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षा पासून ह्या शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्याचे काम शिक्षण विभाग करीत असले तरी त्या बंद करण्याचे धारिष्ट्य मात्र दाखविले जात नाही.त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय करण्याचे काम शिक्षण विभाग व या शाळांचे संस्थाचालक करीत आहेत.पालघर जिल्ह्यात सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये ६४ अनधिकृत शाळा सुरु असून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये या शाळांत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) केले आहे. ह्या ६४ शाळा मधील ४३ शाळा ह्या एकट्या वसई तालुक्यात आहेत. वसई मध्ये मोठ्या प्रमाणात गरीब, परप्रांतीय रहात असून अशिक्षित असलेले पालक अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन त्यांचे भवितव्य अंधारात लोटत आहेत. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादी मध्ये अनेक शाळा ह्या कित्येक वर्षांपासून अनधिकृत म्हणून जाहीर केल्या जात असल्या तरी त्या कायमच्या बंद करण्याची कारवाई का होत नाही हा खरा प्रश्न आहे. ह्या संदर्भात जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना अनेकदा दूरध्वनी केला तरी त्यांनी तो कॉल रिसिव्ह केला नाही. या शाळांतील मुलांचे भवितव्य धोक्यात येईल असे इमोशनल ब्लॅकमेलींग करून या शाळांचे अस्तित्व दर वर्षी कायम ठेवले जाते आहे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केला जातो आहे. हा सारा गोरखधंदा वर्षानुवर्ष दिवसाढवळया सुरू असतांना सुध्दा त्याला कोणीही रोखू शकलेले नाही सरकार कुठल्याही पक्षाचे असो काहीही फरक पडलेला नाही.तालुकानिहाय अनधिकृत शाळा खालीलप्रमाणेवसई१.) डॉ. दी.ज.गाळवणकर इंग्लिश हायस्कूल अर्नाळा कोळीवाडा जुना, २.) रामकृष्ण इंग्लिश स्कूल बोळींज, ३.) प्रार्थना स्कूल कामण, ४.) लिटल एंजल्स हायस्कूल साष्टीकरण पाडा कामण, ५.) बाबा इंग्लिश स्कूल देवदळ कामण, ६.) भावधारा अ‍ॅकेडमी कातकरीपाडा चंदनसार, ७.) अदिन अ‍ॅकेडमी राईपाडा, ८.) सलम इंग्लिश स्कूल कोपरी, ९.) सिद्धी विनायक स्कूल भाटपाडा, १०.) चेलंगे अ‍ॅकेडमी गास कोपरी, ११.) बीबीसी हिंदी स्कूल पाटणकर पार्क नालासोपारा, १२.) राजीव गांधी इंग्रजी माध्यम हायस्कूल निलेगाव नालासोपारा, १३.) सेंट जॉन हायस्कूल आशानगर कोल्ही, १४.) स्वामी विवेकानंद आशानगर कोल्ही, १५.) एम.के.जे. इंग्लिश स्कूल गांजाडीपाडा कोल्ही, १६.) सेंट थोमस स्कूल पाटीलपाडा चिंचोटी, १७.) वन नेस्ट स्कूल गवळीपाडा चिंचोटी, १८.) एफ.के.अ‍ॅकेडमी गोरातपाडा चिंचोटी, १९.) गुरु कुल विद्यालय उंबरपाडा राधावली, २०.) सन इंग्लिश स्कूल मानेचापाडा नालासोपारा, २१.) अ‍ॅम्बेसेडर स्कूल डोंगरपाडा पेल्हार गाव, २२.) ट्विंकल लिटील स्टार हायस्कूल डोंगरपाडा पेल्हार गाव, २३.) मॉर्निंग स्टार स्कूल सह्याद्रीनगर वलई पाडा नालासोपारा, २४.) सीताराम बाप्पा इंग्लिश स्कूल जाबरपाडा नालासोपारा, २५.) सेंट लॉरेट्स स्कूल गणेशनगर बिलालपाडा, २६.) आदर्श कलावती विद्यामंदिर वैष्णव नगर हरवटेपाडा धानीव, २७.) मारुती विद्यामंदिर गावदेवी मंदिर नालासोपारा, २८.) राजीव गांधी मेमोरियल हायस्कूल भाटपाडा धानीव बाग, २९.) फर्स्ट स्टेप स्कूल जाधवपाडा धानीव बाग, ३०.) महात्मा फुले हायस्कूल जाधवपाडा धानीव बाग, ३१.) होरायझन इंग्लिश स्कूल जाधवपाडा धानीव बाग, ३२.) राजापती स्कूल गणेश चाळ, हनुमान मंदिर रोड धानीव बाग, ३३.) के.नगर इंग्लिश अ‍ॅकेडमी अनुचाळ धानीव बाग, ३४.) प्रथमेश पब्लिक हायस्कूल भागवत टेकडी पांढरेपाडा धानीव बाग, ३५.) पिरॅमिड स्कूल सुयोगनगर, ३६.) ट्रँगल अ‍ॅकेडमी हायस्कूल जानकीपाडा वालीव, ३७.) न्यू लिटील स्टार जानकीपाडा वालीव, ३८.) वाय के पाटील हायस्कूल फुलपाडा विरार, ३९.) सिद्धीविनायक शाळा गहूकपाडा विरार, ४०.) ट्विंकल हायस्कूल क्वारी, उर्दू शाळेजवळ, ४१.) दिशा अ‍ॅकेडमी नालासोपारा, ४२.) सूर्योदय बाल विद्यामंदिर (इंग्रजी) नालासोपारा, ४३.) सूर्योदय विद्यामंदिर (हिंदी) नालासोपारा.जव्हार १)आनंदीबाई पागी हायस्कूल दादर कोपरा ता.जव्हार.पालघर१.) दुर्वेस विद्यामंदिर दुर्वेस, २.) आदर्श विद्यालय महागाव, ३.) सानेगुरु जी विद्यालय घाटीम, ४.) मातोश्री आशादेवी विद्यालय बोईसर, 5.) श्री.टी. आर.पी. इंग्लिश स्कूल बोईसर, ६.) सभापती मेमोरियल हायस्कूल बोईसर, ७.) फलाह ए. दराईल उर्दू हायस्कूल सरावली बोईसर, ८.) मदर वेलंकनी इंटरनॅशनल स्कूल कुरगाव, ९.) बोईसर पब्लिक स्कूल सालवड, १०.) लिटील एंजल्स विद्यालय दांडी, ११.) पायोनिअर इंग्लिश स्कूल उमरोळी.विक्र मगड१.) शांतीरतन विद्यालय कोंड्गाव, २.) सरस्वती विद्यालय सावरोली, ३.) श्री.महंत देवीपुराजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कुंजपाडा, ४.) नूतन विद्यालय केगवे.वाडा१.) छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल खानिवली, २.) दाढरे आदिवासी पंचकृषी विद्यालय दाढरे, ३.) यशोदा वाय. चौधरी इंग्लिश स्कूल कुडूस, ४.) कै. बाबुराव जी पाटील माध्यमिक स्कूल मानीवली, ५.) कै. बाबुराव जी पाटील माध्यमिक स्कूल उजैनी.