शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

विकास आघाडीचे ७ उमेदवार बिनविरोध

By admin | Published: December 28, 2016 4:14 AM

या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती.

विक्रमगड : या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती. परंतु सर्वच उमेदवार बिनविरोध झाल्याने आता ६ जानेवारीनंतर नव्या चेअरमनची निवड होणार आहे. एकुण ११ जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अनुसुचित जमातीचे मधुकर खुताडे व भटक्या/विशेष मागासप्रवर्गातील प्रविण संखे हे दोघे अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत़ उर्वरीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी-६ जागा, ओबीसी-१, महिला राखीव-२ अशा ९ जागांकरीता २४ उमदेवार रिंगणात होते. त्यापैकी २२ डिसेबर रोजी माघारीच्या दिवशी काही सदस्यांनी माघार घेतल्याने विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असलेल्या १५ सदस्यापैकी ७ उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत़ त्यामुळे साहजिकच विक्रमगड नगरपंचायतीप्रमाणे सोसायटीच्या निवडणुकीमध्येही विकास आघाडीची सरशी झाली आहे. दरम्यान गेल्या ३५ वर्षात या संस्थेची निवडणूकच झाली नव्हती़ प्रत्येकवेळी आपसांत संगनमत करुन चेअरमनपद एकाच व्यक्तीने भूषविलेले आहे़ मात्र यावेळी निलेश सांबरे, प्रमोद पाटील व नितीन वाडेकर यांनी पुढाकार घेऊन या निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनल उतरविल्याने विरोधकांनी माघार घेणे पसंत केले त्यामुळे विकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध विजयी झाले. या संस्थेमध्ये एकुण मतदार सभासद संख्या ७१५ अशी मोठयास्वरुपाची आहे़ मात्र त्यामधील जवळ जवळ ६२० सभासद हे मयत आहेत़ त्यामुळे येवढया मोठयाकालावधीमध्ये मयतांचे वारस चढविण्यात आलेले नाही़ थातूर मातूर आॅडीट केले जात असल्याने हा प्रश्न कधी सभासदांच्या समोर आलाच नव्हता़ आॅडीटरने प्रत्येकवेळी मयतांचे वारस नोंदविण्याची सूचना केल्या असतांनाही आजतगायत वारस नोंद झालेली नसल्याने अनेक वारस सभासद या निवडणुकीपासून मुकलेले आहेत़ सध्या ७१५ पैकी फक्त ७० ते ८० सभासद जिवंत आहेत़या संस्थेची ३५ वर्षानंतर प्रथम निवडणूक घेण्यात येत आहे़ यावेळी निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीच्या माध्यमातुन या संस्थेवर १५ उमदेवार देऊन निवडणूक घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ३५ वर्षाची संगनमताने बिनविरोध विजयी होण्याची परंपरा मोडीत निघाली़ आता एकुण ११ जागांपैकी ७ जागेवर विकास आघाडीने विजय श्री मिळवला असल्याने एकंदरीत या निवडणुकीवर विकास आघाडीचा प्रभाव स्पष्ट आहे़ (वार्ताहर)