आशिष राणे
वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी कोरोना विषाणूने बाधित 7 नव्या पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यामध्ये 2 महिला व 5 पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तर यातील एका 88 वर्षीय कोरोनाची लागण झालेल्या जेष्ठ नागरिकाचा नालासोपारा पश्चिमेतील खाजगी रुग्णालयात उपचारावेळीच शनिवारी मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेने दिली. शनिवारी वसई- विरार आणि नालासोपारा शहरात 7 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता वसई-विरार महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाने बाधित रुग्ण संख्या 110 वर गेली असून या 7 पैकी नालासोपारात वास्तव्य करणाऱ्या 88 वर्षीय जेष्ठ नागरिकांचा शनिवारी संध्यकाळी रुग्णालयातच मृत्यू झाल्याने आता वसई विरार महापालिका हद्दीतील हा 8 वा बळी असल्याची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे शनिवारी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णामध्ये 2 रुग्ण वृत्तपत्र कार्यालयातील कमर्चारी,1 रुग्ण वृत्तवाहिनीचा संपादक असून 1 रुग्ण शाळेचा व्यवस्थापक आहे तसेच 1 रुग्ण मुंबई मनपाचा कर्मचारी असून त्याच्या संपर्कामुळे त्याच्या गृहिणी पत्नीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी आढळून आलेल्या वसई पश्चिमेकडील 38 वर्षीय महिला हि मुंबईत वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचारी असून सततच्या मुंबई प्रवास असल्याने अखेर ती पॉझिटिव्ह आढळून आली तिला मनपाच्या वसई पूर्वेतील आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवले आहे.तर वसई पश्चिमेतील 29 वर्षीय महिला मुंबई पालिका कर्मचारी असलेल्या आपल्या पतीच्या संपर्कात आल्याने ती सुद्धा हायरिस्क कॉन्टेक मधील असल्याने तिला मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यातच विरार पूर्वेकडील हा रुग्ण मुंबई येथील वृत्तपत्रात कर्मचारी असून त्यास मुंबईत उपचार सुरु आहेत.तर विशेष म्हणजे याच विरार पूर्वेतील 45 वर्षीय रुग्ण हा वृत्तवाहिनीचा संपादक असून त्यास उपचारासाठी दाखल केले आहे.तसेच ३१ वर्षीय रुग्ण हा मुंबई मनपाचा कर्मचारी असून त्याच्यावर देखील मुंबईत उपचार सुरु आहेत आणि याच मुंबईत 28 वर्षीय रुग्ण एक शाळेचा व्यवस्थापक म्हणून आहे त्यास मात्र नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे नालासोपारा पूवेर्तील 88 वर्षीय जेष्ठ रुग्णास तीव्र श्वसन व इतर आजार असल्याने त्यांना चार दिवसापूर्वी नालासोपाराच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले मात्र शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली व त्यांचा मृत्यू झाला. एकूणच शनिवारी संध्याकाळ पर्यँत ही एकूण संख्या 110 वर पोहचली यामध्ये आजवर वसई विरार शहरात 34 जण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने 8 रुग्णाचा मृत्यू झाला.तर अजूनही 68 रूग्ण वसई नालासोपारा व मुंबईच्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेततरी मात्र वसई विरार ची वाटचाल शनिवारी शंभरी पार करून 110 झाली असल्याने पालिकेच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
दिलासा दायक ; दोघे भावंड कोरोना मुक्त !विरार पूर्वेतील दोन्ही भावंडं मधल्या काळात कोरोना बाधित होऊन त्यांची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले होते या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते यातील एक रुग्ण हा मुंबई एअरपोर्ट कर्मचारी असून दुसरा रुग्ण नायर रुग्णालयाचा कर्मचारी आहे.या दोघांनी म्हणजेच दोन्ही भावंडानी कोरोना सारख्या जीवघेण्या आजारावर मात केली आणि त्यांचे कोविड अहवाल देखील निगेटिव्ह आले होते अखेर उपचार पूर्ण झाल्यावर या दोघाना त्यांच्या विरार पूर्वेतील घरी सोडण्यात आले तिथे त्यांचे परिसरातील व संकुलातील नागरिकांनी टाळया वाजवून स्वागत केले.
दि.25 एप्रिल 2020 शनिवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
वसई -1 पुरुष व 2 महिला, नालासोपारा - 2 पुरुषआणि विरार -2 पुरुषएकूण रुग्ण संख्या - 7 मयत -नालासोपारा -1 वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या - 110 कोरोना मुक्त संख्या :- 34 कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 68