शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
5
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
6
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातच सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’,  भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा टोला
7
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
8
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
9
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
10
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
11
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
12
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
13
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
14
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
15
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
16
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
17
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
18
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
19
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
20
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."

८९ संगणकचालक पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:43 PM

उपासमारीची वेळ । पदाधिकारी घेतात राबवून, भाजपच्या कामगार संघटनेचे सदस्य

मीरा रोड : एका कंत्राटदारामार्फत पालिकेच्या सेवेत ८९ कंत्राटी संगणकचालकांना घेतले. मात्र, त्याला डावलून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास नियमबाह्यपणे नेमण्याचा ठराव केल्याने पाच महिन्यांपासून या कंत्राटी संगणकचालकांना पगारच मिळालेला नाही. पदाधिकारी आणि अधिकारी या संगणकचालकांना कामासाठी राबवून घेत असताना पगार मात्र मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हे संगणकचालक भाजपच्याच कामगार संघटनेचे सदस्य आहेत.

मीरा-भार्इंदर महापालिकेने वाढत्या कार्यालयीन कामकाजासह वाढत्या पदाधिकाऱ्यांच्या संख्येमुळे कंत्राटावर संगणकचालक घेतले. २०१५ मध्ये त्यासाठी गणेशकृपा ट्रान्सपोर्टला तीन वर्षांसाठी कंत्राट मिळाले होते. त्याची मुदत २ डिसेंबर २०१८ रोजीच संपली. त्यामुळे डिसेंबरपासून वेतन न मिळाल्याने तसेच मुदतवाढीसाठी संगणकचालकांनी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

संगणकचालक व लिपिक म्हणून घेतलेल्या ८९ कंत्राटी कर्मचाºयांना दरमहिना २२ हजार २५१ रुपये वेतनाप्रमाणे वर्षाला दोन कोटी २७ लाख अशी तीन वर्षे पालिकेने कंत्राटदारास दिली. यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात केलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी एक कोटी ६८ लाख इतकी तरतूद शिल्लक होती.

त्यामुळे डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत संगणकचालकांच्या वेतनावर होणारा ७५ लाख ६५ हजार इतका खर्च शिल्लक रकमेतून वळता करण्याचे १९ जानेवारीच्या महासभेत निश्चित केले होते. परंतु, हा ठराव करताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मात्र मूळ कंत्राटदार गणेशकृपा ट्रान्सपोर्टला मुदतवाढ देण्याऐवजी नव्याने निविदा काढावी व तोपर्यंत सैनिक इंटेलिजन्स व सिक्युरिटी यांच्याकडून आवश्यक संगणकचालक घेण्याचे नमूद केले. मूळ कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याऐवजी थेट मर्जीतील सैनिक सिक्युरिटी या कंत्राटदाराकडून संगणकचालक घेण्याचा नियमबाह्य ठराव केल्याने कायदेशीर आणि तांत्रिक पेच निर्माण झाला.

डिसेंबर व जानेवारी महिन्यांचे वेतन कसेबसे संगणकचालकांना मिळाले. दुसरीकडे पालिकेने कंत्राटदारास मुदत संपल्याने काम थांबवण्याचे पत्र दिले. महासभेतील ठरावात घातलेल्या घोळामुळे फेब्रुवारीपासून जूनपर्यंतचा पगारच या ८९ कर्मचाºयांना मिळालेला नाही. पगार न मिळाल्याने घरखर्च चालवणे अवघड झाले आहे. कर्जाचे हप्ते भरणे, मुलांच्या शाळेचा खर्च भागवणे, औषधोपचाराचा खर्चही अशक्य झाला आहे. अनेकजण व्याजाने वा उसने पैसे घेऊन घरखर्च करत आहेत. ७ जून रोजी झालेल्या महासभेत ज्येष्ठ नगरसेविका रीटा शाह यांनी संगणकचालकांना पगार मिळाला नसल्याचा मुद्दा मांडला होता.

लोकप्रतिनिधींना घातले साकडेमहापालिका अधिकारी, पदाधिकारी या संगणकचालकांकडून मात्र नियमित कामे करून घेत आहेत. पगार नसल्याने कर्मचाºयांनी महापौर डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. रवी व्यास यांना साकडे घातले आहे. आयुक्तांसह लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत.