पारोळ : आचोळे सबस्टेशनच्या केबलचे काम सुरु असतांना फीडर ट्रिप झाला. तो चार्ज केल्याने केबलचा स्फोट होऊन महावितरणचे ८ कर्मचारी भाजलेत. त्यापैकी ३ कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील अॅलायन्स व वसईतील गोल्डन पार्क या रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी आचोळे येथे घडली.सबस्टेशनच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने १२ कर्मचारी येथे काम करत होते काम करत असतांना फीडर चार्ज केल्याने केबल चा स्फोट होऊन मिलिंद पाटील, प्रकाश शिंदे, हरेश करपे, परमेश्वर कवळे, बळीराम जगताप, अश्वर शेख, जलिंदर राठोड व ठेकेदार सज्जन हे या स्फोटात जखमी झाले. तर या जखमी मध्ये मयूर डावाने, अन्वर शेख, बळीराम जाधव यांची प्रकृति चिंताजनक आहे.या सबस्टेशन मध्ये काम करणारे कर्मचारी अनुभवी असतांना ही हा प्रकार घडला कसा याची चौकशी करणार असल्याचे महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.
सबस्टेशनच्या केबलमध्ये बिघाड महावितरणचे ८ कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:00 AM