पालघर : जिल्हा परिषद पालघर गटाच्या एकूण १७ जिल्हा परिषद गटासाठी ८८ नामनिर्देशन पत्र तर पंचायत समितीच्या ३४ गणासाठी १८४ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांनी दिली.पालघर तालुक्यातील एकूण १७ जिल्हा परिषद गटांपैकी तारापूर गटात ५ अर्ज दाखल झाले तर तारापूर पंचायत समिती गणात ३ व कुरगाव गणात 3 अर्ज दाखल झाले. दांडी जि.प.साठी ३ तर पंचायत समितीच्या दांडी गणासाठी १४ तर नवापूर गणासाठी ७ अर्ज दाखल झाले.
पास्थल जि.प.साठी ३ अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या सालवड गणासाठी २ अर्ज तर पास्थल गणासाठी ८ अर्ज दाखल झाले. बोईसर जि.प.साठी १० अर्ज तर पंचायत समितीच्या काटकरपाडा गणासाठी ५ अर्ज तर बोईसर गणासाठी ४ अर्ज दाखल झाले. वंजारवाडासाठी ५ अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या बोईसर गणासाठी ४ तर काटकरपाडा गणासाठी ५ अर्ज दाखल झाले. सरावली गटासाठी ३ अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या सरावली गणासाठी एक तर सरावली गणासाठी ५ अर्ज दाखल झाले. खैरापाडा जि.प.साठी ३ अर्ज तर पंचायत समितीच्या उमरोळी गणासाठी ५ अर्ज तर खैरापाडा गणासाठी ६ अर्ज दाखल झाले. शिगाव जि.प.साठी ७ अर्ज तर पंचायत समितीच्या माण गणासाठी ६ अर्ज तर शिगाव गणासाठी ४ अर्ज दाखल झाले. बºहाणपूर जि.प. साठी ११ अर्ज तर पंचायत समितीच्या बºहाणपूरसाठी २ अर्ज तर टेणसाठी ८ अर्ज दाखल झाले. मनोर जि.प.साठी ८ अर्ज तर पंचायत समितीच्या कोंढाण गणासाठी १४ अर्ज तर मनोर गणासाठी ८ अर्ज दाखल झाले. सावरे-एम्बूर जि.प.साठी ४ अर्ज तर पंचायत समितीच्या सावरेसाठी ८ अर्ज तर दहिसरतर्फे मनोरसाठी ७ अर्ज दाखल झाले. नंडोरे-देवखोप जि.प.साठी ६ अर्ज तर पंचायत समितीच्या धुकटण गणासाठी ७ अर्ज तर नांडोरे-देवखोप गणासाठी ५ अर्ज दाखल झाले. सातपाटी जि.प.साठी ३ अर्ज तर पंचायत समितीच्या मुरबे गणासाठी ६ अर्ज तर सातपाटी गणासाठी ६ अर्ज दाखल झाले. शिरगाव जि.प.साठी २ अर्ज तर पंचायत समितीच्या शिरगाव गणासाठी २ अर्ज तर माहीम गणासाठी ३ अर्ज दाखल झाले. केळवे जि.प.साठी ५ अर्ज तर पंचायत समितीच्या केळवे गणासाठी ५ अर्ज तर मायखोप गणासाठी ३ अर्ज दाखल झाले. एडवण जि.प.साठी ६ अर्ज तर पंचायत समितीच्या एडवण गणासाठी ४ अर्ज तर विराथन बुद्रुक गणासाठी ४ अर्ज दाखल झाले. सफाळे जि.प.साठी ४ अर्ज तर पंचायत समितीच्या सफाळे गणासाठी ५ अर्ज तर नवघर-घाटीम गणासाठी ७ अर्ज दाखल झाले. त्यामुळे पालघर जि.प.च्या १७ गटासाठी एकूण ८८ नामनिर्देशन अर्ज तर पंचायत समितीच्या ३४ जागांसाठी एकूण १८४ अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती गजरे यांनी दिली.डहाणूत १८६ अर्ज दाखल : डहाणू/बोर्डी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकरिता डहाणू तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या १३ गटांकरिता ७१ नामनिर्देशन प्राप्त झाले. ओसरवीरा गटात सर्वाधिक १० अर्ज दाखल झाले असून वणई ८, कासा ७, गंजाड आणि जामशेत ६, धामणगाव, मोडगाव, सायवन, चिंचणी आणि सरावली गटात प्रत्येकी ५ तर कैनाड ४, धाकटी डहाणू ३ आणि सर्वात कमी बोर्डी गटातून २ अर्ज आहेत. तर बोर्डी २, अस्वाली ७, धामणगाव ५, आंबेसरी ५, हळदपाडा ४, मोडगाव ४, सायवन 3, चळणी २, शेणसरी ५, ओसरवीरा ४, कासा ७, मुरबाड ६, विवळवेढे ६, गंजाड ४, रायतळी ७, जामशेत ३, कैनाड २, चिखले ३, सरावली ४, डेहणे ४, धाकटी डहाणू ३, आसनगाव ४, चिंचणी २, वाणगाव ५, वणई ५ आणि रणकोळ ९ अशा एकूण २६ गणासाठी ११५ अर्ज प्राप्त झाले.