पालघर/विक्रमगड : पालघर-मनोर-विक्रमगड महामार्गावर बोरांडा फाट्यावर भरधाव डम्परने शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास एसटीला धडक देत अर्धे कापत नेले. या अपघातात हर्षित हनुमंत गवते (११ महिने, चिंचारे) याचा मृत्यू झाला. तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींना मनोर ग्रामीण रुग्णालयासह अन्य रुग्णालयात दाखल केले.
झाडामुळे बसचा मोठा अपघात टळला -भरधाव वेगातील डंपरने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, बस काही अंतर पाठीमागे ढकलली गेली. अपघातग्रस्त एसटी रस्त्यालगतच्या खजुराच्या झाडाला अडकली, अन्यथा बस रस्त्यालगतच्या शेतात उलटून जखमींच्या संख्येत वाढ झाली असती, बचावकार्यात अडथळे आले असते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.