शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

गर्भवतीचा लाकडावरून नदीतून प्रवास; मोखाड्यातील कुर्लोदमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 7:42 AM

पावसाळ्यात चार गावपाड्यांचा तुटतो संपर्क

रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क

मोखाडा (जि.पालघर) : समस्यांच्या  गर्तेत  अडकलेल्या आदिवासीबहुल कुर्लोदपैकी शेड्याचापाडा येथील सुरेखा लहू भागडे (वय २२) या  नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मंगळवारी पहाटे ताप-उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर, गावकऱ्यांनी तिला लाकडावर बसवून तुडुंब भरून  वाहणाऱ्या देवबांध-पिंजाळ नदीचा प्रवाह पार करून दवाखान्यात पोहोचवले.  

 कुर्लोद ग्रामपंचायतीमधील शेड्याचापाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा या गावपाड्यांसाठी रस्ताच नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढल्यास या पाड्यांचा संपर्कच तुटतो. काही महिन्यांपूर्वी या नदीवर एका संस्थेकडून मोठा बंधारा बांधण्यात आला. यामुळे पाणी कमी असेल, तर यावरून जाणे-येणे शक्य होते. 

पाच वर्षांत दगावले नऊ रुग्ण 

कामानिमित्त किंवा आजारी पेशंट झाल्यास, येथील आदिवासींना  नदीतून जीवघेणी कसरत करावी लागते. पाच किलोमीटरचा डोंगर तुडवत केवनाळे गाठावे लागते. तिथे गाडी भेटली तर ठीक, नाहीतर २० किमीची पायपीट करावा लागते.

वेळोवेळी मागणी करूनही पुलाचा विषय सुटलेला नाही. पावसाळ्यात वेळेत उपचार न  मिळाल्याने ५ वर्षात ९ रुग्ण दगावले आहेत.    - मोहन मोडक,     उपसरपंच, कुर्लोद ग्रामपंचायत.