मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत कर्मचाºयांच्या बायोमेट्रिक थंब हजेरीत बहुतांश वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कामावर येताना हजेरी लावतात. पण कामावरुन सुटण्याच्या वेळी मात्र नोंद टाळत असल्याचा घोटाळा समोर आला आहे. काही जण हजेरी लावून किंवा अर्ध्या दिवसातच रुग्णालयातले काम सोडून पालिकेचा पगार पूर्ण लाटत असल्याचे उघड झाल्याने वेळ नमूद नसतानाही त्यांचे वेतन काढले जाते कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिकेचे भार्इंदर पश्चिमेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, तर मीरा रोड येथे भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. दोन्ही रुग्णालयांवर पालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लिपिक आदी अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून त्यात काही कायम तर काही अस्थायी स्वरुपात आहेत. जोशी रुग्णालयात ३७ कायमस्वरुपी, ८८ अस्थायी, २० एनयुएचएममधील डॉक्टर-कर्मचारी आहेत. शिवाय नऊ डॉक्टर मानद सेवा तत्वावर कार्यरत आहेत. मीरा रोडच्या गांधी रुग्णालयातही ३८ स्थायी, १३ अस्थायी, एनयूएचएमचे १६ तर मानद तत्त्वावर ७ डॉक्टर कार्यरत आहेत.
अपूर्ण हजेरी लावूनही पूर्ण पगाराचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:11 AM