- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सुनावणी घेणाºया उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपण टेक्निकल अॅथॉरिटी नसल्याने ठोस कारवाई करता येत नसल्याचे सांगून कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.लोकमतने ‘आबिटघर गाव घातक प्रदूषणाच्या विळख्यात’ या मथळ्याखाली दि. ११ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कारखानदार व अधिकाºयांचे चांगलेच धाबे दणाणले होते. यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात वाड्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १५) सुनावणी घेतली. मात्र या सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुजित डोलम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासन ह्या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देत असल्याचा आरोप तक्रारदार विश्वास पाटील व आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.सुनावणीप्रसंगी तक्रारदार विश्वास पाटील यांनी ठाम भूमिका घेत कारखान्यांमुळे होणाºया प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. त्याला उपस्थित गावकºयांनीही दुजोरा दिला.मात्र, डोलम यांनी सादर केलेल्या अहवालात कारखान्यांकडून होणारे प्रदूषण हे घातक नसल्याचा निर्वाळा दिल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. यामुळे प्रशासनाने सुनावणी घेऊन प्रदूषणाविरोधात सुरु केलेली कारवाई ही केवळ फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी करावी, अशी मागणी होते आहे.प्रदूषणकारी कारखान्यांना यापूर्वी वारंवार नोटीस बजावून सुधारणा करावयास सांगितले आहे. सद्यस्थितीत असलेली प्रदूषणाची पातळी घातक नसल्याने कारखाने बंद करण्याची कारवाई करता येत नाही.- सुजित डोलम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, कल्याणप्रदूषणासंदर्भात टेक्निकल अॅथॉरिटी ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. आपण या परिसराची पहाणी करणार आहोत. परंतु कारवाईचे अधिकार देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाला असल्याने यासंदर्भात त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे.- मोहन नळदकर,उपविभागीय अधिकारी, वाडाप्रदुषणकारी कारखान्यांना प्रशासन पाठीशी घालेल याची भीती आहेच. स्थानिकांच्या आरोग्यासाठी प्रदूषणाविरोधात आम्ही आमची लढाई सुरु ठेवू.-विश्वास पाटील, तक्र ारदार
प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? प्रांत म्हणतात, ‘मी टेक्निकल अॅथॉरिटी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 2:48 AM