शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 12:58 AM

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात यशस्वी रंगीत तालीम

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या हालचालींनी वेग धरला असून लसीकरणासाठीची रंगीत तालीम (ड्राय रन) शुक्रवारी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मासवण आश्रमशाळा येथे जि.प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या विशेष देखरेखीखाली पार पडली.

जिल्ह्यातील एकूण १६,००० कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी ही ड्राय रन आयोजित करण्यात आली असून कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे. लस घेतेवेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. लस घेणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती ओळखपत्रे, कागदपत्रे सोबत घेऊन जावीत, अशी माहिती जिल्हाधिऱ्यांनी देऊन ही रंगीत तालीम म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण असल्याचे मत व्यक्त केले.जिल्ह्याला ही लस प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११ हजार ९१३, खासगी शहरी व ग्रामीण भागातील ५ हजार ४९८ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. लसीकरणसंदर्भात आवश्यक असलेल्या बाबींची पूर्वतयारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमांचे पालन करून ही रंगीत तालीम घेतली गेली. या वेळी प्रत्यक्षात लस टोचली नसली तरी लस टोचण्यासाठी झालेली पूर्वतयारी याची पाहणी या वेळी उपस्थित मान्यवरांनी केली. या वेळी जि.प. सदस्या अनुश्री पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे, आयुष अधिकारी डॉ. तन्वीर शेख, डॉ. महेश बडगुजर, इतर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.