वसई : आज जगाला शांतीची नितांत गरज असून तत्पूर्वी सर्वधर्मीय बांधवांनी आपापल्या धर्मात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करत ते आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचा सर्वदूर असा अर्थपूर्ण संदेश नाताळनिमित्ताने बिशप हाऊस आयोजित ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र मामध्ये उपस्थितांना दिला.
नाताळ सणानिमित्ताने स्टेला येथील बिशप हाऊसमध्ये सर्वधर्म मैत्री आयोगातर्फेनाताळ स्नेहभाव मैत्रीचे आयोजन केले होते. त्या वेळी वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो हे उपस्थित सर्व धर्मीय गुरूंना व इतर बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आपल्या मार्गदर्शन विवेचनात बिशप यांनी प्रभू येशू ख्रिस्त हे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मले. आजच्या युगात नाती विस्कळीत होताना, ती तुटत असताना स्वत:बरोबर, इतरांबरोबर, निसर्गासोबत आणि विधात्याबरोबर सर्वधर्मीय बांधवांनी नाती जपली पाहिजेत, असा सर्वदूर अर्थपूर्ण संदेश या वेळी आर्च बिशप डॉ. फेलिक्स यांनी दिला. दरम्यान, सुरुवातीला चुळणे ग्रामस्थांनी संगीत, वाद्याद्वारे प्रार्थना आणि प्रभू येशूच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्र म संपन्न झाला. यानंतर उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरू आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यावर या नाताळ संध्येला सुरुवात झाली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरू, मान्यवर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विशेष व्यक्ती उपस्थित होते.यामध्ये ज्येष्ठ विचारवंत फा. फ्रान्सिस दिब्रिटो, खासदार राजेंद्र गावित, वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, मौलाना अब्दुल सुबहन खान, आचार्य नरहरी, अमील साहेब मुर्तजा सि. कॅन्ड्रीन, ब्रह्मकुमारी सारिका आणि प्रा.सोमनाथ विभुते तसेच माजी महापौर नारायण मानकर आणि विविध धर्मीय पदाधिकारी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याविषयी आपले प्रास्ताविक मांडताना ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व धर्मांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.क्रांती नव्हे, तर शांती हवीच्या स्नेहमेळाव्याचे ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रास्ताविक केले. आज जगात श्रीमंत व गरीब यांची दरी वाढत आहे. भीतीसोबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपल्याला क्रांती नाही तर शांती हवी. श्रीमंत व गरीबही हे अंतर कमी करण्यासाठी सर्वधर्मांनी पुढाकार घ्यायला हवा व सामन्यांच्या मागे उभे राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.