पालघर : उमरोळी स्थानकावरु न पनवेल स्टेशन चे तिकीट न देण्याच्या पश्चिम रेल्वेच्या चुकीच्या धोरणाचा फटका उमरोळी मधील एका गरीब कुटुंबाला बसला असून पटेल कुटुंबियांने आपला आधारस्तंभाच या अपघातात गमावला आहे. या अपघाताने पूर्ण पटेल कुटुंब उघड्यावर पडले आहे.उमरोळी येथे राहणारे महेंद्र डाया पटेल (वय ४५) यांच्या पत्नी रमीला यांना उमरोळीहुन पनवेलला जायचे असल्याने सकाळी उमरोळी स्थानकावर ५ वाजून ५४ मिनिटांनी येणाऱ्या डहाणू-पनवेल मेमू पकडण्यासाठी स. ५.१५ ला पोचले. तेथील तिकीट खिडकीवर त्यांनी पनवेलसाठीच्या तिकीटची मागणी केली. मात्र उमरोळी स्थानकावर अनारिक्षत तिकीट प्रणाली नसल्याने त्यांना पनवेलचे तिकीट नाकारण्यात आले. त्यांना खूप महत्वाचे काम असल्याने त्यांना पनवेल मेमू गाडी पकडणे खूप गरजेचे होते.त्यामुळे त्यांच्या पुढे एकतर पालघर अथवा बोईसर स्टेशन पैकी एकाची निवड करणे क्र मप्राप्त होते. त्यांनी पालघर ला ६ वाजून २ मिनिटानी पोचणारी गाडी पकडणे अधिक उचित ठरेल असे ठरवून पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकल वर पत्नीला बसवून ते पालघर च्या दिशेने निघाले. उमरोळी च्या पेट्रोलपंप च्या वळणावर (मोहरे ब्रिज) त्यांच्या मोटारसायकल ला एका अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघे पतिपत्नी गंभीर जखमी झाले. हे दोघेही पती पत्नी सुमारे एक ते दीड तास गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पालघर मधील खाजगी रु ग्णालयातील उपचार परवडणारे नसल्याने त्यांना सिल्वासा येथील रुग्णालायात नेले. मात्र त्यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना शेवटी मृत्यू ने गाठले. तर त्यांच्या पत्नी आजही उपचार घेत आहेत.
अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:44 AM