मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेस जवळ झालेल्या टेम्पो लक्झरी बस अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी उंच डिव्हायडर असता तर त्या दोघांचे प्राण वाचले असते. आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये आय आर बी कंपनीने रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना प्राणस मुकावे लागते.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने टेम्पो जात असताना त्याचे पुढचे उजवे टायर फुटले चालकाचा ताबा सुटला व डिव्हायडरची उंची कमी असल्याने मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसला त्याने धडक दिल्याने टेम्पोमध्ये असलेले सुनील रामू पवार , चालक व त्याची पत्नी देवी यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही भिवंडी येथील असून त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास सपोनि अक्षय सोनावणे करीत आहेत.मुंबई-अहमदाबाद रा. महामार्गावर होणारे अपघात आहेत त्यास जबाबदार आय आर बी कंपनी व एन एच आय असून अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये त्रुटी ठेवल्या आहे कुठे डीव्हायडर उंची कमी, रस्त्याचे काम अपुर्ण तर कुठे तीन रस्त्यानंतर अचानक त्याचे दोन लाईन होणे, अवैध क्रॉसिंग त्यामुळे अपघात होतात अशी प्रतिक्रिया आदिवासी पुनर्वसन संघटनेचे कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी लोकमतकडे व्यक्त केली. (वार्ताहर)
अपघातात पतीपत्नी जागीच ठार
By admin | Published: January 06, 2017 6:02 AM