कासा : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास भरु च (गुजरात) कडून मुंबईकडे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचा चारोटी उड्डाणपूलावर गाडीचा ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात झाला. यामध्ये ट्रक चालकाचा जागीच होरपळून मृत्यु झाला तर रस्त्याच्या बाजूला उभे असणारे ४ प्रवासी यात जखमी झाले होते.या घटनेनंतर या ठिकाणी तब्बल २ ते ३ तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टँकरमधे हायड्रोजन गॅसच्या १३३ टाक्या होत्या. त्यापैकी केवळ ३ टाक्यांचाच स्फोट झाल्याने २ किमी अंतरापर्यन्त त्याचा आवाज ऐकू येत होता. ही दुर्घटना काही प्रमाणात कमी झाली. तरी कदाचित आणखी काही टाक्यांचा स्फोट झाला असता तर मोठी जीवित हानी होण्याची भीती होती परंतु एक मात्र नक्की हे सर्व बघुन चारोटी करांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.२२ मार्च २०१४ रोजी याच ठिकाणी रसायन टँकर पलटी होऊन स्फोट झाला होता. त्यामध्ये ८ जणांचा बळी गेला होता या मध्ये कैनाड येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४ जण जखमी झाले होते. पाच गाड्या पेटल्या होत्या व अप्सरा हॉटेलचे पूर्णत: जळून गेले होते. या घटनेनंतर सहा वर्षा पूर्वी चारोटी या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा ठेका असणाºया आयआरबी कंपनीने मागणीची अंमलबजावणी करत याठिकाणी पुलाचे काम पूर्ण केले.पुलाच्या उभारणीनंतर या ठिकाणच्या अपघातांना पायबंद न बसता त्यात वाढ झाली आहे. गत महिन्याभरात कार पुलावरून पडली व दोन मोटारसायकल चा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या पुलावर दोन्हीही बाजून चुकीच्या पद्धतीने तीव्र उतार व धोकेदायक वळण दिले आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणाहून वेगाने जाणारी वाहने उलटतात याच महामार्गाने रोजच्या रोज अनेक ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्या ही लक्षणीय असते. पुलावर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्याने हे ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारे टँकर वेगाने धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वास्तविक पाहता महामार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्या लक्षणीय असल्याकारणाने सदर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे शक्य असताना देखील आयआरबी प्रशासनाने त्या बाबतीत तशी तरतूद का केली नाही असा प्रश्न चारोटी वासिय नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान या बाबत एन एच आय टेक्निकल मॅनेजर दिनेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.महामार्गावर चारोटी उड्डाण पुलावर उतार व चढणीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टर्न दिला आहे.तो वाहन चालकाच्या लक्षात येत नाही त्यामुळे अपघात होतात.आनंदराव काळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कासा
पुलावरील धोकादायक वळणामुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:00 PM