शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

विरारमध्ये भरदिवसा बंगल्यात घुसून चौघांवर चाकूहल्ला, आरोपीने हाताची नस घेतली कापून; हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 7:57 AM

विरार पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह चारही जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला का आणि कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस शोध घेत असून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा/पारोळ : विरारच्या खानिवडे गावातील एका बंगल्यात २३ वर्षीय आरोपीने शनिवारी सकाळी दिवसाढवळ्या चौघांवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने घाबरून बाथरूममध्ये बंद करून हाताची नस कापून घेतली आहे. विरार पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह चारही जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला का आणि कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस शोध घेत असून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विरारच्या खानिवडे गावात राजेश कमलाकर तरे हे आपल्या परिवारासह राहतात. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी सूरज आंबेकर (२३) हा धारदार चाकू घेऊन तरे यांच्या बंगल्यात घुसला. आरोपीने त्यांच्या दोन्ही मुलींवर चाकूने सपासप वार करून रक्तबंबाळ केले. तर दुखवट्यासाठी आलेले राजेश यांचे नातेवाईक रमेश तरे व त्यांची भावजय अंजली तरे यांनी वाचवण्यासाठी मध्ये पडताच त्यांच्यावरही वार केले. बंगल्यामध्ये हल्ला झाल्यानंतर आरडाओरडा झाल्यावर जमलेल्या गावकऱ्यांनी या घटनेची खबर विरार पोलिसांना दिली. पोलीस आल्यावर आरोपीने स्वतःला बाथरूममध्ये बंद करून डाव्या हाताची नस कापून घेतली. दरम्यान, या चाकूहल्ल्याने घरभर रक्ताचा सडा पडला होता. गावकऱ्यांच्या साहाय्याने पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा फोडून सावधगिरीने आरोपीला बाहेर काढून ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्यल्दाखल केले आहे. गावकऱ्यांनी चारही जखमींना विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे.

आरोपीने शनिवारी सकाळी घरात घुसून चाकूने चौघांवर हल्ला केला आहे. यात दोन्ही तरुणींच्या हातावर, पायावर, पोटावर वार केल्याने गंभीर जखमा झाल्या असून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. आरोपीनेही हाताची नस कापून घेतली असल्याने त्यालाही ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. आरोपीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याने हा हल्ला का व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध घेत तपास करत आहोत.- सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विरार पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई