- हितेन नाईकपालघर : माहीम-केळवे रस्त्यावरील सर्व्हेे नं ७३३/१ मधील जमिनीवर बांधण्यात आलेली ‘शीतल सागर’ ही इमारत प्रमुख राज्यमार्गाच्या आड येत असल्याच्या तक्रारी वर इमारतीचे मालक अनिल गोयल यांनी दाखल केलेले अपील कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहे. त्यामुळे ह्या इमारतीवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.माहीमच्या शांतशील रिसॉर्ट समोरील सर्व्हे नं. ७३३/१ पै. २५.० आर क्षेत्रावर शीतल सागर या ४४ फ्लॅट व १४ व्यावसायिक गाळे बनविलेल्या रहिवासी संकुलाचे बांधकाम प्रमुख राज्यमार्गा मध्येच करण्यात आल्याची तक्रार माहीमचे सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार, प्रांताधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, पालघर यांच्याकडे केली होती. सततचा पाठपुरावा केल्यानंतरही काही विभागांकडून कारवाईसाठी टाळाटाळ होत असतांना म्हात्रे यांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांमुळे या सर्व विभागाना म्हात्रे याच्या तक्रारीच्या अनुषंगाने शीतल सागर इमारतीवर कारवाईचे आदेश द्यावे लागले होते. त्याविरोधात शीतल सागरचे मालक अनिल गोयल, रोहित गोयल यांनी कोकण विभागीय महसूल आयुक्ताकडे अपील दाखल केले होते.त्यात तहसीलदार पालघर, नगर रचनाकार पालघर, ग्रामपंचायत माहीम, प्राथमिक आरोग्य केंद्र माहीम यांनी बिनशेतीसाठीची शिफारस व ना हरकत दाखले सन २०१०-११ साली दिलेले आहेत. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करण्यास परवानगी दिली असतांना विवादित जागेमध्ये रस्त्याच्या मध्यापासून आवश्यक अंतर सोडलेले नसल्याचे करण देऊन ६ फेब्रुवारी २०१२ ला बिनशेती आदेशास स्थगिती देऊन अतिरिक्त बांधकामास, खरेदी-विक्रीस अप्पर जिल्हाधिकाºयांनी प्रतिबंध केला होता.शीतल सागर इमारती मधील ४० फ्लॅट व १४ गाळ्याचे बांधकाम पूर्ण केल्यावर त्यातील २० फ्लॅट व १ गाळ्याची नोंदणीकृत दस्ताने विक्री होऊन मालकाला २ कोटी ५३ लाख ९३ हजार ४८८ रुपये मिळाले आहेत. या इमारत उभारणीसाठी एकूण ७ कोटी ८० लाख ९९ हजार ४८८ झाला आहे. कारवाई झाल्यास आपले एकूण १७ कोटी ७९ लाख २३ हजार ४६८ रु पयांचे नुकसान होणार असल्याचा मालकाचा दावा होता. म्हणणे मांडण्यात येऊन अपील मंजूर करण्यात यावे अशी विनंती अपीलकर्ते गोयल कुटुंबीयांनी आयुक्तांना केली होती. मात्र अप्पर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणा संधर्भात दोन वेळा अंतिम आदेश दिले आहेत. अपिलार्थी हे न्यायालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करीत असल्याने हे अपील फेटाळण्यात आल्याचे कोकण विभागाचे अपर आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. त्यामुळे शीतल सागर इमारती मध्ये स्वकष्टाने विकत घेतलेल्या घरावर संकट उभे राहिले आहे.>हा सत्याचा विजय ! प्रदूषण या विरोधात लढा देत असून अनेक वेळा जीवघेणा हल्ला होऊनही ते या कु-प्रवृत्ती विरोधात आजही लढा देत आहेत. आजचा निर्णय हा सत्याचा असत्यावरील विजय असल्याची प्रतिक्रि या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी लोकमतला दिली.
शीतल सागरवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 3:15 AM