शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांनी उचलली पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:36 PM

नालासोपारा : राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी नालासोपारा परिसरात संचारबंदीतदेखील काही बिनकामाची माणसे विनामास्क, मोकाट फिरताना दिसतात. अनेकदा ...

नालासोपारा : राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी नालासोपारा परिसरात संचारबंदीतदेखील काही बिनकामाची माणसे विनामास्क, मोकाट फिरताना दिसतात. अनेकदा आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर वसईतील सातही पोलीस ठाण्यांनी पावले उचलून गुरुवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कारवाईसाठी पथके नेमली आहेत. तर कारवाई करणाऱ्यांची कोरोना चाचणीही केली जात आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामानिमित्तच बाहेर पडण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. मात्र लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी एक शॉर्ट फिल्म बनवूनही लोकांना घरी राहण्यासाठी विनंती केली होती. मात्र त्याकडेही लोक कानाडोळा करीत असल्याने शेवटी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी कडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. 

वसई तालुक्यातील ग्रामीण भागातही कोराेना रुग्ण वाढत आहेत.  प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सिस्टर हेदेखील कोरोनाचे शिकार होत आहेत. शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र याचे नालासोपारा परिसरात पालन होताना दिसत नव्हते.

वसई, विरार, नालासोपारा येथे अनेक लोक बिनधास्त विनाकारण फिरताना दिसतात. अशा विनाकारण फिरणाऱ्या व नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.  गुरुवारपासून वसई, माणिकपूर, नालासोपारा, तुळींज, वालीव, विरार, अर्नाळा या सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळी पथके तयार करून कारवाई केली जात आहे.

गुरुवारी वसई, माणिकपूर, वालीव आणि तुळींज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या १८९ आणि विनामास्क फिरणाऱ्या १०९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणीही करून घेतली जात आहे. तुळींज आणि वालीव येथील ५७ नागरिकांची कोरोना चाचणी केली असून, यात दोन जण पॉझिटिव्ह सापडले. शुक्रवारी माणिकपूर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या १६ नागरिकांना ताब्यात घेऊन दिवाणमान तलाव येथील आरोग्य केंद्रात त्यांची कोरोना चाचणी केली असता ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार