वसंत भोईरवाडा : पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौर्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी आपली असामान्यपणाची प्रतिमा बदलण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांत मिसळण्याचा फार्स केल्याचे चित्र बुधवारच्या वाडा दौऱ्याच्या निमित्ताने पहायला मिळाले. दरम्यान, ठाकरे यांच्या भेटीसाठी वाडा येथे दूरदूरहून आलेल्या कार्यकर्त्यांना भर उन्हात वाट पाहत तब्बल तीन तास ताटकळत राहावे लागल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर होता.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे हे १ मे पासून राज्याच्या दौºयावर निघाले आहेत. याची सुरुवात त्यांनी पालघर जिल्ह्यातून सुरवात केली असून मंगळवारी त्यांनी वसई येथे जाहीर सभा घेतली. बुधवारी विभागवार बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वाड्यात दुपारी दोन वाजता आयोजित केलेल्या बैठकीत ते कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार होते. परंतु ते तब्बल तीन तास उशीरा आल्याने जव्हार, डहाणू, मोखाडा, विक्र मगड, वाडा या परिसरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागल्याने कार्यकर्ते चांगलेच हिरमुसले होते. ठाकरे यांनी सायंकाळी पाच वाजता कार्यक्र माच्या ठिकाणी पोहचून कार्यकर्त्यांच्या भावना व प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला.राज ठाकरे हे सामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत त्याच्यांशी ते तुसडेपणाने वागतात अशी गेल्या काही वर्षांत त्यांची प्रतिमा बनली होती. या दौºयाच्या निमित्ताने ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून होत असल्याचे या दौºयात दिसले. यावेळी त्यांनी दुपारचे भोजन वाडा तालुक्यातील रायसळ या गावातील एका आदिवासी कार्यकत्याच्या घरी घेत सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी वाडा येथे बैठकीसाठी आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी एका चांगल्या हॉटेलचा आश्रय घेतल्याने हा सामान्यपणाचा फार्सच केल्याचे दिसून आले. व्यासपीठावरही न बसता व्हीआयपी खुर्ची नाकारून कार्यकर्त्यांमध्ये एका साध्या खुर्चीत बसत आपले नेतृत्व हे सामान्य असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या दौर्या दरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, अविनाश जाधव, राजन गावंड उपस्थित होते.
‘राजदर्शना’साठी कार्यकर्ते ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:34 AM