पालघर : आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी तब्बल पाच तास पालघर जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा आदिवासींशी संबंधित सर्व शासकीय योजना आणि धोरणांचा आढावा घेतला. जिल्हा शासकीय दौयाला मंगळवारपासून सुरूवात झाली. सकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासींचे जीवनमान दर्जात्मक असायला हवे अशी अपेक्षा यावेळी पंडित यांनी व्यक्त केली. आपल्या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी युवक आणि युवती या स्पर्धात्मक युगात टिकायला हवेत, चमकायला हवेत यासाठी आदिवासी आश्रमशाळा, शिक्षण व्यवस्था , स्पर्धापरीक्षा अभ्यास केंद्र यांचा विकास होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुपोषण निर्मूलनाबाबत पंडित यांनी आढावा घेतला. अंगणवाडीत होणाया पोषण आहार पुरवठ्याबाबत माहिती घेण्यात आली, अंगवाड्यांमध्ये कनेक्टव्हिटी समस्या असल्याने रिअल टाइम मॉनेटरिंग होत नसल्याने कुपोषणाची आकडेवारी, सॅम मॅम श्रेणीप्रमाणे तपशील वेळच्या वेळी येत नाही याबाबत दखल घेण्याच्या पंडित यांनी संबंधित अधिकायांना सूचना केल्या. इयत्तवाढीनंतर वर्ग खोल्यांची त्रुटी समोर आली. याबाबत आढावा घेऊन जिल्हा पातळीवर उपाय योजना करता येऊ शकतील ह्या बाबत अधिकायांना सुचना केल्या.आढावा बैठकच्पालघर जिल्हा मुख्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत प्रत्येक विषयाचा, योजनेचा सविस्तर आढावा पंडित यांनी घेतला.च्वन हक्क अधिनियम , रोजगार हमी सारख्या योजना राबवताना येत असलेल्या अडचणी, धोरणात्मक त्रुटी पंडित यांनी बारकाईने समजून घेतल्या.