वसई : एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली हरित, स्वच्छ आणि सुंदर वसई असा नारा द्यायचा, त्यात शहरात आधीच कमी उरलेली खेळाची मैदाने आणि जी अस्तित्वात आहेत त्याच खेळांच्या मैदानात कचराकुंडी उभारून नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचा महाप्रताप काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला होता.मात्र नवघर माणिकपूर विभागातील चुळणेवासियांच्या प्रचंड विरोधामुळे व आंदोलनाचा इशारा दिल्यावर अखेर आयुक्तांनी ही वादग्रस्त आणि डोकेदुखी ठरलेली खेळाच्या मैदानातील सिमेंटची कचराकुंडी शुक्रवारी संध्याकाळी जमीनदोस्त करून ह्या वादावर पडदा पाडला आहे.वसईच्या एच प्रभाग अंतर्गत चुळणे गावातील एकमेव अशा खेळाच्या मैदानात महापालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या हट्टामुळे सिमेंटची कचराकुंडी बांधण्यात आली होती. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांना व त्या ठिकाणी होणाºया विविध कार्यक्रासाठी येणाºया नागरिकांची दुर्गंधी मुळे मोठी गैरसोय व्हायची.पहिल्या पासूनच ग्रामस्थ या कचराकुंडीच्या विरोधात होते, याबाबत अनेकदा त्यांनी ही कचराकुंडी हलविण्यांत यावी यासाठी स्थानिक नगरसेवक फ्रँक आपटे यांना विनंती केली. मात्र ही कचराकुंडी इथेच राहणार, किंबहुना कोण ही हलवते ते बघतो असा दम देऊन हा प्रश्न तीन महिन्यापासून टोलवत ठेवला, स्थानिक नगरसेवकांच्या हटवादी धोरणामुळे याठिकाणी जागृती संस्थेच्या जॅक गोम्स यांनी आपल्या शिष्टमंडळा तर्फे १४ आॅगस्ट रोजी महापालिका आयुक्तां ची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, प्रसंगी त्यांना घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा दाखवले, त्याचवेळी आयुक्त सतीश लोखंडे यांनी आपल्या आरोग्य खात्याचे नवघरचे जितेंद्र नाईक यांना हि कचराकुंडी हलवा असे निर्देश दिले मात्र स्वच्छता निरीक्षक नाईक यांना नगरसेवक आपटे यांनी ती हलविण्यास आडकाठी केल्याचे गोम्स यांनी सांगितले. त्यामुळे हा वाद आणखीनच पेटला दोनच दिवसापूर्वी गोम्स यांनी आयुक्तांना इशारा देऊन हि कचराकुंडी हलविण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा देताच हा वाद आणखीनच पेटू नये याकरता अखेर आयुक्तांनी हि वादग्रस्त कचराकुंडी आपल्या पथकास सांगून जमिनदोस्त केली, आणि या वादावर एकदाचा पडदा टाकला. त्यामुळे नगरसेवकाला धडा शिकवला गेला आहे.मैदानातील कचराकुंडी हलवून इतर ठिकाणी नेण्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा केला मात्र आयुक्तांनी आदेश देऊन ही नगरसेवकाने न ऐकता लोकांच्या आरोग्याशी खेळून हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनविला, याला लोकशाही म्हणत नाही, याउलट हा वाद म्हणजे नगरसेवक वरचढ महापालिका का असा झाल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.जॅक गोम्स
अखेर ‘ती’ कचराकुंडी हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:05 PM