पालघर : दिवाण आॅण्ड सन्स औद्योगिक वसाहतीत घातक रसायनावर प्रक्रि या न करता ते थेट उघड्या नाल्यात सोडून प्रदूषण करणाºया पालघर प्लायवूड ह्या कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण नियंत्रण क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी कारवाई केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रार केल्यावर प्रदूषण मंडळा कडून ही कारवाई करण्यात आली.पालघर मध्ये दिवाण अँड सन्स अल्याळी, पालघर औद्योगिक वसाहत, जेनेसीस वसाहत, दांडेकर वसाहत शिरगाव, सिद्धिविनायक आदी औद्योगिक वसाहती असून सुमार १ हजार कारखाने आहेत. जिल्हाधिकारी कार्यालया जवळ असणाºया काही कारखान्या मधून केमिकलचा उग्र वास येत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालया कडून तारापूर नियंत्रण मंडळा कडे करण्यात आली होती. तर माहीम ग्रामपंचायतीने ही काही कारखाने पानेरी नाल्यात प्रदूषित रसायने सोडत असल्याची तक्र ार केली होती. त्याअनुषंगाने क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी गुरु वारी माहीम ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय मेहेर यांच्या सह पानेरी नदीच्या केलेल्या नाल्याच्या पहाणीमध्ये ड्युरीअन कंपनीच्या मागे चोरट्या पद्धतीने टाकाऊ रसायन नाल्यात सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.अमोनियाचा साठा तपासणीत सापडलामंडळाचे अधिकारी लाटे, ग्रामपंचायत पदाधिकारी हे तत्काळ कंपनीत पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना कंपनीच्या एका टाकीतून निघणारे टाकाऊ (वेस्ट) अमोनिया हे रसायन त्या पाईपद्वारे नाल्यात सोडत असल्याचे दिसले याचवेळी मोठ्या प्रमाणात अमोनिया रसायनांचा साठाही तपासणी दरम्यान आढळला.प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाºयांनी याबाबतीत कंपनी प्रशासनास विचारणा केली असता कंपनीने सादर केलेल्या बिलावर हे रसायन पालघर प्लायवूड नावाने आले असल्याचे व ही ड्युरीअन ची जागा पालघर प्लायवूड ला भांड्यांने दिल्याचे सांगितले. मात्र अशा प्रकारची कंपनीच प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नसल्याचे अधिकाºयांना निदर्शनास आल्याने ही कंपनी छुप्या मार्गाने बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे विना परवानगीने कंपनी सुरू करणे, बेकायदेशीर रित्या टाकाऊ अमोनिया नाल्यात सोडणे आदी कारणान्वये पालघर प्लायवूड कंपनी कायम स्वरूपी बंद करण्याचा (फायनल क्लोजर) अहवाल आपण ठाणे येथील वरिष्ठ कार्यालया कडे पाठविल्याचे लाटे ह्यांनी लोकमत ला सांगितले.
रासायनिक पाणी थेट नाल्यात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीनंतर प्रशासन कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 4:07 AM