पारोळ : काश्मिरच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर तेथील जनता आनंदी आहे, असे प्रतिपादन भाजपच्या काश्मीरमधील नेत्या हीना भट यांनी वसईत केले. मी काश्मिरी मुसलमान आहे. मी ज्या श्रीनगरमध्ये राहते तेथे १०० टक्के काश्मिरी मुसलमान आहेत. त्यामुळेच हे विधान मी जबाबदारीने करत असल्याचेही त्या म्हणाल्या. काही फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याने त्यांच्याकडून जाणीवपूर्वक काश्मीरची शांतता भंग करण्यावर चाप बसला आहे.
भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे वार्षिक स्नेह संमेलनप्रसंगी भट उपस्थित होत्या. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे, सत्कार, कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजप वसई रोडचे अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन तसेच ‘उत्तम दृष्टीकोन’ मासिकाच्या बोधचिन्हाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.केरळचे राजा शशिकुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेश आंदोलनामध्ये अयप्पा स्वामी भक्तांवर कम्युनिस्ट सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रात साडेसात लाख कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या मान्यवरांना ह्यप्रतीक्षा ट्रस्टह्णच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये दाक्षिणात्य कादंबरीकार वी. आर. सुधीष, चित्रपट कथा लेखक क्षत्रुखणन, व्यंगचित्रकार रजींद्र कुमार, ज्योतिष व आध्यात्मिक गुरू पी. के. सहदेव कुरूप, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया मेनन, समाजसेवक कृष्णन कुट्टी नायर, वसंत शहा, निलेश भातुसे, वसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरीष्ठ डॉ. अलमास खान आदींना सन्मानित केले.
यावेळी केरळचे राजा शशिकुमार वर्मा, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, माजी आमदार भाजपा नेते हेमेंद्र मेहता, दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक ए. के. सुनील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.