हितेन नाईक
पालघर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंदे्र आदी ५६ ठिकाणी ११ लाख २० हजार रुपये खर्चून बसविण्यात आलेली बायोमेट्रिक मशिन्स मागील दोन वर्षांपासून कार्यान्वित न होता धूळ खात पडून आहेत. या बायोमेट्रिक कार्डचे सॉफ्टवेअर खराब झालेले असतांना आरोग्य विभागाने लाखो रुपयांची रक्कम ठेकेदारांला अदा ही केली आहे.आरोग्य सेवा संचालनालया अंतर्गत कार्यरत राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, अन्य अधिकारी, कर्मचारी, तसेच राज्यातील निमशासकीय कार्यालये, महामंडळे, यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदणी पद्धत सामान्य प्रशासन विभागा कडून लागू करण्यात आली होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व बायोमेट्रिक यंत्र कार्यान्वित करून मुख्यालयाशी संलग्न करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक प्रणाली बंद पडल्यास या बाबतचे प्रमाणपत्र जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी स्वत: दिल्यानंतरच अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या महिन्याचेच वेतन अदा करता येईल असे परिपत्रक आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ.सतीश पवार ह्यांनी काढले आहे. अशावेळी ह्या परिपत्रकाला तिलांजली देऊन मागील दोन वर्षांपासून सर्व अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन सुरळीत सुरू आहे. तर दुसरीकडे नसल्याचे दिसून येत असल्याची टीका माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला जात असतांना या बाबत जिल्हा परिषदेच्या बैठकीत एक अवाक्षरही काढले जात नसल्याबाबत ही खेद व्यक्त केला जात आहे.जिल्हाधिकाºयांनी दिले ११ लाख २२७ यंत्रे निघाली अत्यंत निकृष्टच्माजी उपाध्यक्ष पाटील ह्यांनी सामान्य प्रशासनाकडे मागितलेल्या माहिती नुसार संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांच्या कडील ११ डिसेंबर २०१५ च्या पत्रांन्वये नाविन्यपूर्ण योजनेतून ५६ बायोमेट्रिक मशिन्स खरेदी साठी ११ लाख २० हजाराच्या मागणी प्रस्तावां प्रमाणे जिल्हाधिकाºयांनी २८ डिसेंबर २०१५ रोजी सर्व रक्कम वितरित केली होती.च्ठाणे जिल्हा परिषदेने पालघर पंचायत समितीला ४५ वाडा पंचायत समितीला ३०, वसई पंचायत समितीला २६, विक्रमगड पंचायत समितीला २२, जव्हार पंचायत समितीला २८, तलासरी पंचायत समिती १६, डहाणू पंचायत समिती ३७, मोखाडा पंचायत समिती २३ अशा एकूण २२७ बायोमेट्रिक यंत्रणेचे वाटप करण्यात आले असतांना ती सारी यंत्रे निकृष्ट निघाली होती. तरीही त्यातून पालघर जिल्हा परिषदेने कुठलाही बोध घेतला नाही.आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत बायोमेट्रिकचा विषय चर्चेला आला. या संदर्भात अधिक चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश आरोग्य अधिकाºयांना दिले आहेत. -मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी.