डहाणू : आदिवासी समाजाच्या स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा विषय हाती घेत उपोषणाला बसलेले जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांच्या दणक्यानंतर शासनाला जाग आली असून दोन दिवसांत हंगामी वसतिगृह सुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.डहाणू तालुक्यात रोजगारासाठी स्थलांतरीत पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी शासनाची हंगामी वसतिगृहाची योजना अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. हे वसतिगृह सुरु करण्यासाठी जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांनी सोमवारी पंचायत समिती समोर उपोषण सुरु केले होते. त्यानंतर डहाणू पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांनी मंजुरी मिळताच दोन दिवसात हंगामी वसतिगृह सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकुर, डहाणू तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश पारेख, नगराध्यक्ष रमीला पाटील, गटनेते मिहीर शहा हे देखील उपोषणला बसले होते. (वार्ताहर)
उपोषणानंतर हंगामी वसतीगृह सुरु होणार
By admin | Published: January 05, 2017 5:30 AM