शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

कोरोनावर मात करुन गाठलं 'माऊंट एव्हरेस्ट', हर्षवर्धनने फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 5:00 PM

वसईच्या दिवाणमान गावातील तरुणाने भारत मातेसह "माउंट एव्हरेस्ट" वर फडकविला वसई विरार महापालिकेचा झेंडा ; कोरोना वर मात करीत दि.23 मे रोजी गाठलं जगातील सर्वोच्च शिखर !

ठळक मुद्देहर्षवर्धन हा आधीपासूनच गिर्यारोहक म्हणून वसई कराना परिचित होता तर आपण माऊंट एव्हरेस्ट सर करायचे त्याचे हे जुने स्वप्न होते आणि यासाठी आर्थिक पाठबळ ही भरपूर प्रमाणात लागणार होतं

आशिष राणे, वसई  

- वसईत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने जगातील सर्वोच्च शिखर असलेलं "माउंट एव्हरेस्ट" हे नव्या उंचीचं शिखर नुकतेच सर केल असून खास म्हणजे या संपूर्ण मोहीमेत लागणारी काही साहित्य ही इकोफ्रेंडली स्वरूपाची होती. 

मूळचा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नवघर माणिकपूर शहरांतील दिवाणमान येथील हर्षवर्धन जोशी (25) याने ऐन कोविड-19 च्या महामारीत ही धाडसी कामगिरी करुन दाखवत भारतमातेच्या झेंड्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचा झेंडा देखील त्यानं या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर फडकविला. त्यामुळे, वसईचे नाव आता एव्हरेस्टवर लिहिले गेलं आहे.

हर्षवर्धन जोशी (25) हा आय टी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना व या मोहिमेत त्याला कोविडने ग्रासले असताना त्यावर ही मात करून त्याने ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवघेणी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर वसईकरांनी व खास करून दिवाणमान गावातील लोकांनी त्याचे जंगी स्वागत केलं. सातोरी एडव्हेंचर एव्हरेस्ट अभियान यांच्यातर्फे मार्च 2021 मध्ये ही तीन सदस्य असलेली एव्हरेस्ट शिखर मोहीम राबवण्यात आली होती. यात अभियान निदेश प्रबंधक ऋषी भंडारी यांच्या सांगण्यानुसार, या तीन सदस्यांमध्ये हर्षवर्धन जोशी, नेपाळी फुर्ते शेरपा आणि अनुप राय यांचा समावेश होता.

हर्षवर्धन हा आधीपासूनच गिर्यारोहक म्हणून वसई कराना परिचित होता तर आपण माऊंट एव्हरेस्ट सर करायचे त्याचे हे जुने स्वप्न होते आणि यासाठी आर्थिक पाठबळ ही भरपूर प्रमाणात लागणार होतं तरीही त्यानं जिद्दीने यासाठी स्वतः ची बचत केलेली रक्कम,मित्र, काही कंपनी, नातेवाईक तसेच वसई विरार शहर महानगरपालिका यांना ही मदतीसाठी आवाहन केले होते. त्यावेळी वसई विरार महानगरपालिका क्रीडा विभागाचे वतीनं त्यास चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तर या मोहिमेत त्याला 60 लाखाहून अधिक खर्च आल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. 30 मार्च रोजी हर्षवर्धन जोशीने वसईवरून नेपाळ देशासाठी प्रवास सुरू केला आणि प्रत्यक्षात 6 एप्रिल 2021 ला त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यास सुरुवात केली. मात्र, हे सर्वोच्च शिखर सर करताना त्याला कोरोना ने गाठलं  आणि आठ दिवस बेस कॅम्प मध्ये तंबूत स्वतः ला आयसोलेशन मध्ये ठेवून त्यावर त्याने यशस्वी मात ही केली

आणि पुन्हा एव्हरेस्ट वर चढाई सुरू केली.

अखेर तो दिवस उजाडला आणि दि 23 मे 2021 रोजी सकाळी हर्षवर्धनने ही आतंरराष्ट्रीय एव्हरेस्ट अभियान मोहीम पूर्ण करत प्रथम भारताचा झेंडा व नंतर वसई विरार महापालिकेचा झेंडा या जगातील (8848.00 मीटर ) या सर्वोच्च शिखरावर फडकवत हर्षवर्धनने त्याचे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे अद्वितीय स्वप्न अखेर पूर्ण केलं. 

पालघरला दुसऱ्यांदा मिळाला मान

खरं तर या मोहिमेला हर्षवर्धनची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहूनच त्याच्या घरच्यांनी व मित्रांनी व महापालिका प्रशासनाने त्याला मदतीचा हात दिला. आज त्यानं केलेली कामगिरी ही शब्दात व्यक्त करता येत नसल्याचं त्याच्या मित्रांनी व घरच्यांनी सांगितलं. मात्र, या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे महाराष्ट्रात पालघर जिल्ह्याचा मान पुन्हा दुसऱ्यांदा वाढला आहे. या आधी पालघर जव्हार च्या आश्रम शाळेतील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी मागील वर्षी माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं त्यामुळे आता पुन्हा या यशस्वी मोहिमेमुळे येथील पालघर जिल्ह्यातील व वसई तालुक्यातील तरुण मुलां मुली मधील आत्मविश्वास वाढला आहे.

या मोहिमेत इको फ्रेंडली साहित्याचा वापर !

खरं तर शिखर सर करताना गिर्यारोहक हे गर्मी व इतर गोष्टींच्या वापरासाठी डिझेल सोबत नेतात मात्र इथ हर्षवर्धन टीमनं हिट व गरमी साठी मोबाईल सोलर पॅनलचा वापर केला आणि तो यशस्वी झाला.

बहरीनचे राजा माउंट एव्हरेस्टच्या नवीन उंचिचे शिखर सर करणारे पहिले राजे ठरले !

हर्षवर्धन यांच्या टीम आधी 16 जणांचा एक चमू म्हणजेच बहरीनच राजे मुहम्मद हमद मुहम्मल अल खलिफा यांनी त्यांच्या "रॉयल गार्ड"या टीमने माउंट एव्हरेस्ट ची नवीन उंची चे (8848.86 मीटर ) शिखर सर करीत ही फक्त 0.86 सेंटिमीटर वाढलेली ही उंची सर करणारी पाहिली टीम ठरली आहे.आणि याच्या पाठोपाठ च हर्षवर्धन ची टीम होती.

टॅग्स :Everestएव्हरेस्टcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारpalgharपालघर