पारोळ : वसई तालुक्यातील खानिवडे उंबरपाडा रेती बंदरावर सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रक, जेसीबी वर पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकारलेल्या पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी छापे मारून करोडो चा मुद्दे माल जप्त केला. या कारवाईचा रेती व्यवसायि कांनी विरोध करत रेतीच्या भरलेल्या गाड्या सोडताना बंदरात उभे राहून पैसे घेता. मग कारवाई का करता असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.विरारच्या हद्दीत चिखलडोंगरी, खार्डी, शिरगाव, वैतरणा चांदीप, उसगाव, खाणीवडे, हेदिवडे, चिमणे, नारंगी, तानसा आणि कोसिबे असे १२ रेतीबंदरे आहेत. या बंदरांवर वाळूमाफियांकडून वाळूउपसा सुरूच होता. या वाळूउपशामुळे वैतरणा आणि शिरगाव रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे. वैतरणा खाडीतून वाळूउपसा करून खानिवडे ते उंबरपाडा रस्त्यावरून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरूच होती. शासकीय वाहने या रस्त्याने येऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खड्डे करण्यात आले आहेत; तसेच रेतीच्या गाडीची ओळख पटू नये यासाठी गाड्यांच्या नंबर प्लेटवर चिखल, वंगण, ग्रीस लावले जाते.पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी स्वत: धाडसत्र सुरु केले असून या धाडीत या पथकाने ४३ ट्रक, १ कार, १ जेसीबी असा ४ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर वाळूमाफियांनी सात ट्रक पळवून नेले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान वसई तालुक्यात काही महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच हा कारभार चालत असल्याचे दस्तुरखुद्द वाळू काढणार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. विरार पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी बंदरात सिव्हिल ड्रेसवर गाड्या मोजण्यासाठी असतो. आणि तो पैसे जमा करतो जर पैसे घेता मग कारवाई कशाला करता असा सवाल विचारला जात आहे. जर पोलीस अधीक्षक सिंह यांना जर खरोखर हि वाळू तस्करी रोखायची असेल तर त्यांनी वसुलीबाज पोलीस कर्मचाºयांना शोधून त्यांना कंट्रोल ला जमा करावे. आणि ज्यांच्या हद्दीतून रेती काढली जाईल त्या अधिकाºयावर कारवाई करा असे सांगितले.>वाळूमाफियांचा सल्लारेती उत्खननावर बंदी असताना महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नजरेआड रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. त्यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.अधिकारी हे संपत्ती गोळा करीत आहेत. जर त्यांना शासनाने परवानगी दिल्यास तो पैसा शासनाला जाईल असा सल्ला वाळू माफिया देतात.
पैसे घेता, मग रेतीच्या गाड्या का पकडता?, रेतीमाफियांनी पोलिसांना विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:24 AM